World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर गुणतालिकेत किंचितसा फरक, टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र बदलतं. अर्थात ऑस्ट्रेलिया श्रीलंका सामन्यानंतरही गुणतालिकेत फरक पडला आहे. पण हवा तसा काही उलटफेर वगैरे झाला नाही. उलट श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाची उपांत्य वाट आणखी कठीण झाली आहे.

World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर गुणतालिकेत किंचितसा फरक, टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम
World Cup 2023 Points Table : श्रीलंकेची उपांत्य फेरीची वाट कठीण, ऑस्ट्रेलियाला मिळालं थोडसं बळImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 10:29 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने सुरु आहे. गेल्या काही दिवसात बऱ्याच उलथापालथ झालेलं पाहायला मिळाल्या. काही संघांनी चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, दिग्गज संघांची सुमार कामगिरी पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. टॉप चार संघात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ असतील असं भाकीत अनेकांनी वर्तवलं होतं. पण त्यांची स्पर्धेतील वाट बिकट झाली आहे. दुसरीकडे, श्रीलंकेने आणखी दोन सामने गमावले तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. सध्या गुणतालिकेत तळाळी असलेल्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला तीन सामन्यानंतरही काही सूर गवसलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत मोठा काही फरक दिसून आलेला नाही. गुणतालिकेत खाली तेवढा फक्त काही बदल झाला आहे.

गुणतालिकेत किंचितसा फरक

गुणतालिकेत भारतीय संघ 6 गुण आणि +1.821 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र नेट रनरेट भारतापेक्षा कमी असल्याने फटका बसला आहे. तिसऱ्या स्थानावर 4 गुणांसह दक्षिण आफ्रिका, तर पाकिस्तानही 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड पाचव्या, अफगाणिस्तान सहाव्या, बांगलादेश सातव्या, ऑस्ट्रेलिया आठव्या, श्रीलंका नवव्या आणि नेदरलँड सर्वात शेवटी दहाव्या स्थानावर आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात 14 वा सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून जिंकला. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ 209 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेनं दिलेले 210 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवून 35.2 षटकात पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.