AUS vs AFG | ग्लेन मॅक्सवेल याची ऐतिहासिक खेळी, ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर 3 विकेट्सने विजय

Australia vs Afghanistan | ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल याच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर अशक्य असा विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तर अफगाणिस्तानने जिंकलेला सामना गमावलाय.

AUS vs AFG | ग्लेन मॅक्सवेल याची ऐतिहासिक खेळी, ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर 3 विकेट्सने विजय
ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने 2 शतकं ठोकली आहेत. मॅक्सवेलने 8 सामन्यांमध्ये 397 धावा केल्या आहेत.
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 2:10 AM

मुंबई | ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामना जिंकून दिला आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सलग सहावा विजय ठरला आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ग्लेन मॅक्सवेल याच्या द्विशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह नवव्यांदा वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे.

त्याआधी अफगाणिनस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झद्रान याने सर्वाधिक 129 धावांची शतकी खेळी केली. राशिद खान यान नाबाद 35 धावा केल्या. रहमतने 30 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने 26 रन्स केल्या. अझमतुल्लाहने 22 तर गुरुबाजने 21 धावा जोडल्या. मोहम्मद नबीने 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने 2, तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या तिघांनी 1-1 विकेट गेली.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाची 292 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. टॉपसह मिडल ऑर्डरमधील फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर फ्लॉप ठरले. दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला झटपट धक्के दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 18.3 ओव्हरमध्ये 7 बाद 91 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर पॅट कमिन्स याच्या मदतीने ग्लेन मॅक्सवेल याने वन मॅन शो गेम बदलला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

पॅट आणि ग्लेन या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 202 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने विजयी षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. तसेच या सिक्ससह ग्लेनने द्विशतकही पूर्ण केलं. ग्लेनने 128 बॉलमध्ये 21 चौकार आणि 10 सिक्ससह नाबाद 200 धावा केल्या. तर पॅटने 68 बॉलमध्ये नॉट आऊट 12 रन्स केल्या.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.