IND vs AUS Final : अंतिम फेरीबाबत पॅट कमिन्स असं काय बोलून गेला! सेमीफायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर म्हणाला की..
World Cup 2023 Final : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीतील दोन्ही संघांचं निश्चित झालं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा, तर भारत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यास उत्सुक आहे. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना तुल्यबल असेल यात शंका नाही. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्ण पॅट कमिन्सने आपलं मत मांडलं.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ भिडणार आहे. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 साली हे दोन संघ अंतिम फेरीत भिडले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 20 वर्षानंतर आमनेसामने येणार आहेत. 20 वर्षांपूर्वीचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोणता संघ विजय मिळवतो याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आहे. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी दक्षिण अफ्रिकेनं चांगलंच झुंजवलं. 48 व्या षटकापर्यंत हा सामना लांबला. पण ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीपूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स?
“आपच्यापैकी काही जण याआधी फायनलमध्ये खेळले आहेत. तर टी-20 विश्वचषक फायनलमध्ये इतर काही जण खेळले आहेत. अहमदाबादचं स्टेडियम खचाखच भरले जाणार आहे, बहुतेक सर्वच लोकं भारताला सपोर्ट करणारे असतील. परंतु त्याचा आम्ही आधीच स्वीकार केला आहे. 2015 विश्वचषक माझ्या कारकिर्दीतील ठळक आठवणींपैकी एक होता. मी इथे भारतात आणखी एक विश्वचषक फायनल खेळेन असे कधीच वाटले नव्हते.”, असं पॅट कमिन्स याने सांगितलं.
साखळी फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. भारतासमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 4 गडी गमवून 41.2 षटकात पूर्ण केलं. भारताने या सामन्यात 3 गडी शून्यावर गमवले होते. पण केएल राहुल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभळला आणि विजय मिळवून दिला.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियन संघ: डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवे, मार्कस स्टोइनिस, मिचेल मार्श, सीन अबोट, एलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, एडम झाम्पा, जोश हेझलवूड,मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार)