ENGvsAUS : ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने बेन स्टोक्सची उडवली खिल्ली, ‘हा’ फोटो छापल्याने इंग्लंडमध्ये संताप!
सामन्याचा शेवटच्या दिवशी जॉनी बेयरेस्टोची विकेट चांगलीच वादात सापडली होती. कॅमरून ग्रीनच्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळून जॉनी बेयरेस्टो क्रीज सोडून बाहेर आला होता. त्यानंतर कीपरने केलेल्या थ्रो वर त्याला आऊट दिलं होतं. हा वादा आता टोकाला पोहोचला आहे.
लंडन : क्रिकेट विश्वात मानाची स्पर्धा अॅशेस मालिका ओळखली जाते. इंग्लड आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेकडे अवघ्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं असतं. 2 जुलै रोजी अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 43 धावांनी विजय मिळवला. कांगारुंनी पॅट कमिन्सच्या नेतृत्वात इंग्लंडला दुसऱ्यांदा पराभवाची धुळ चारली. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बेन स्टोक्सने 155 धावा करुनही इंग्लंडला सामना जिंकता आला नाही.
सामन्याचा शेवटच्या दिवशी जॉनी बेयरेस्टोची विकेट चांगलीच वादात सापडली होती. कॅमरून ग्रीनच्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळून जॉनी बेयरेस्टो क्रीज सोडून बाहेर आला. बेयरेस्टो बाहेर येताच ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने त्याला थ्रो करत स्टंपिंग आऊट केलं. बेयरेस्टो ओव्हर संपल्यामुळे क्रीजच्या बाहेर आला होता, ऑस्ट्रेलियाने अपील केल्यावर बेयरेस्टोला आऊट देण्यात आलं. यानंतर सोशल मीडियात यावर जोरदार चर्चा रंगली. बेयरेस्टो आऊट होता कि नाही यावर वाद सुरु झालाय.
मॅच संपल्यावर इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स बेयरेस्टोच्या विकेटवर बोलला. आमची टीम असती तर ऑस्ट्रेलियाचा कोणताच खेळाडू असा आऊट झाला नसता. आम्ही अपीलच केली नसती. बेन स्टोक्सच्या वक्तव्यानंतर हा वाद खूपच वाढला. यावर ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने बेन स्टोक्सचा एक वादग्रस्त फोटो न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर छापलाय.
न्यूजपेपरमध्ये छापलेला फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोवर बेन स्टोक्सने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. “हा मी नव्हेच, कारण मी अनेक दिवसांपासून नव्या बॉलने गोलंदाजी केलेलीच नाही.” बेन स्टोक्स याने 2018 साली बॉल टेम्परिंग प्रकरणाचा धागा पकडत ऑस्ट्रेलियाला मीडियाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Ben Stokes finds the funny side of the Australian news headlines after the second Ashes Test. pic.twitter.com/8FCFPyyKFu
— CricTracker (@Cricketracker) July 4, 2023
दोन्ही संघाची प्लेइंग 11
बेन स्टोक्स (कॅप्टन), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पियरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलँड आणि मायकल नेसर.