पॅट कमिन्सकडून छोटीशी चूक, मयंतीऐवजी मयंकला टॅग करुन सांगितली ‘ही’ गोष्ट, पुढे काय झालं?
आयपीएल स्थगित झाल्यानंतर पॅट कमिन्सने लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर हिच्याशी एका मुलाखतीदरम्यान गप्पा मारल्या. यावेळी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतल्या अनेक आठवणी सांगितल्या. (Australian player Pat Cummins tagged mayank Agrawal place mayanti langer)
मुंबई : भारतात कोरोनाचा प्रकोप वाढलाय. दररोज 3 ते 4 लाख लोकांना कोरोनाची लागण होतीय तर कित्येक जणांचे जीव जातायत. आयपीएलच्या (IPL) दरम्यान खेळाडूही कोरोनाच्या तावडीतून सुटले नाहीत. जवळपास 10 ते 12 खेळाडूंनी कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत आयपीएलचं 14 वं पर्व स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. स्पर्धा स्थगित झाल्यानंतर खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. आता ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याने एक ट्विट केलं, जे ट्विट करताना त्याच्याकडून छोटीशी चूक केली. जेव्हा त्याला आपली चूक कळाली तेव्हा त्यालाही हसू आवरलं नाही. (Australian player Pat Cummins tagged mayank Agrawal place mayanti langer)
पॅट कमिन्सकडून छोटीशी चूक
आयपीएल स्थगित झाल्यानंतर पॅट कमिन्सने लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर हिच्याशी एका मुलाखतीदरम्यान गप्पा मारल्या. यावेळी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतल्या अनेक आठवणी सांगितल्या. या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना त्याने मयंतीच्या ऐवजी मयंक अग्रवालला टॅग केलं.
Good fun chatting to @mayankcricket and @Swannyg66 on the Players Lounge Podcast a couple of weeks back! https://t.co/elURWhdx4v
— Pat Cummins (@patcummins30) May 9, 2021
पॅट कमिन्सचा ‘मॅटर’ मयंकला कळाला
पॅट कमिन्सकडून झालेली चूक मयांक अग्रवालच्या लक्षात आली. त्याने ट्विट करत “आपण चुकील्या माणसाला टॅग केलंय….” असं म्हणत त्याने पॅटला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला… कमिन्सची ही पोस्ट तसंच मयंकचा हा रिप्लाय पाहून मयंतीलाही हसू अनावर झालं. तिने ट्विटरवर हास्याचे दोन इमोजी शेअर करत एपीक असं लिहिलं.
@patcummins30 You got the wrong person Pat ?
— Mayank Agarwal (@mayankcricket) May 9, 2021
?? #epic
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) May 9, 2021
कोरोनाबाधितांसाठी कमिन्सचा पुढाकार
काही दिवसांपूर्वी भारतातली कोरोना परिस्थिती पाहून 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत करण्याची घोषण करुन तो चर्तेत आला होता. पण नंतर त्याने युटर्न घेत ती रक्कम पीएम केअर्सऐवजी (PM CARES FUND) कोव्हिड-19 पीडितांसाठी काम करणाऱ्या युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोव्हिड-19 क्रायसिस अपीलला दिली आहे.
(Australian player Pat Cummins tagged mayank Agrawal place mayanti langer)
हे ही वाचा :
विराट, रोहित आणि बुमराहशिवाय टीम इंडियाचा श्रीलंका दौरा, कर्णधार, सलामीवीर, स्पिनर कोण असणार?
प्रिती झिंटासोबत असलेला क्रिकेटपटू कोण?, फोटो शेअर करताना ‘कमाल’ कॅप्शन, नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा!