Video : राजकोटमधील उकाड्याने कांगारू हैराण, स्मिथची परिस्थिती पाहून कोहलीने घेतली फिरकी

IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तिसरा आणि अखेरचा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 352 धावांचा डोंगर रचला. मात्र फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज उकाड्याने हैराण झाले.

Video : राजकोटमधील उकाड्याने कांगारू हैराण, स्मिथची परिस्थिती पाहून कोहलीने घेतली फिरकी
Video : राजकोटच्या उकाड्याने स्टीव्ह स्मिथचं डोकं फिरलं, कोहलीने अशी घेतली मज्जाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 6:31 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा वनडे सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या ठिकाणी प्रचंड उकाडा असल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज हैराण झाले. दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा तर उकाड्यामुळे अस्वस्थ झाल्याचं दिसून आला. इतकंच भर मैदानात खुर्ची मागवावी लागली. इतकंच काय तर डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवण्याची वेळ आली. हा संपूर्ण प्रकार वॉशिंग्टन सुंदर टाकत असलेल्या 29 व्या षटकात पाहायला मिळाला. मिचेल मार्श 96 धावा करून बाद झाला. यानंतर विकेट ब्रेक मिळाला पण स्टीव्ह स्मिथ अक्षरश: गळून पडला होता. त्यामुळे त्याने थेट ड्रेसिंग रुमकडून मदत मागवली.

स्टीव्ह स्थित याची परिस्थिती पाहून विराट कोहली मार्नस लाबुशेन याच्याकड आला आणि त्याची फिरकी घेऊ लागला. या दरम्यान कोहलीन डान्सही केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टीव्ह स्मिथ 61 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला पायचीत केलं. स्मिथने वनडे क्रिकेट कारकिर्दित 5 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या. तसेच विजयासाठी 353 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडू डेविड वॉर्नरने 56, मिचेल मार्शने 96, स्टीव्ह स्मिथने 74 आणि लाबुशेननं 72 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 2, सिराज 1, रवींद्र जडेजा 1 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 1 गडी बाद केला.

भारताने तीन सामन्यांची मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकताच ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलियाने दिलेलं 353 धावांचं आव्हान टीम इंडिया गाठणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.