Ind vs Aus : टीम इंडियाचा तो अवतार पाहून ऑस्ट्रेलियाचा कोच घाबरला, म्हणाला भीती वाटली जे घडलं ते खूपच भयानक…
इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत कसोटी सामना सुरू आहे. सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत कसोटी सामना सुरू आहे. सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा ओपनर सॅम कॅन्स्टस आणि जसप्रीत बुमराहमध्ये थोडा वाद झाला, त्यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केलं. त्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय संघातील खेळाडू एकाच वेळी सॅम कॉन्स्टसकडे धावले ते दृष्य पाहाण्यासारखं होतं. बुमराह हा कॅन्स्टसला खुन्नस देत होता तर बाकीचे खेळाडू त्याच्याजवळ जल्लोष करत होते.
आता या घटनेवर अखेर ऑस्ट्रेलियाच्या कोचने प्रतिक्रिया दिली आहे.टीम इंडियानं ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं ते भीतीदायक होतं असं ऑस्ट्रेलियाच्या कोचनं म्हटलं आहे, तसेच आयसीसीकडून देखील अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
ऑस्ट्रेलियन कोच टेन्शनमध्ये
भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत सॅम कॅन्स्टसचा वाद झाला, त्यानंतर बुमराहने दुसऱ्याच बॉलवर उस्मान ख्वाजाला बाद केलं.त्यानंतर टीम इंडियानं सॅम कॉन्स्टसकडे धाव घेतली. याची ऑस्ट्रेलियन कोच एंड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी चांगलीच धास्ती घेतली. टीम इंडियाच्या जल्लोषावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले की जर विरोधी टीम नॉन स्ट्रायकर फलंदाजाकडे या पद्धतीनं धावत येत असेल तर त्या फलंदाजाची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे.मी त्याला विचारलं की तू मानसिक दृष्या फीट आहेस का? तू उद्या पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतोस का?
आयसीसीवर केला गंभीर आरोप
जी घटना घडली त्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन कोच हे खूपच नाराज होते. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. आयसीसी टीम इंडियावर काहीतरी कारवाई करेल असं त्यांना वाटत असल्याचं दिसून आलं, मात्र त्यांनी स्पष्टपणे तशी मागणी केली नाही, मी याचा निर्णय हा मॅच रेफरी एंडी पायक्रॉफ्ट यांच्यावर सोडल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते ते करतील असं ऑस्ट्रेलियाच्या कोचने म्हटलं आहे.