T20 World Cup : आयसीसींच्या ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियाचीच एकहाती सत्ता, आतापर्यंत ‘इतक्या’ ट्रॉफी जिंकल्यात!
आयसीसींच्या ट्रॉफींवर ऑस्ट्रेलियाची एकहाती सत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आणि पुरूष दोन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसत आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्य महिला संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. यंदाचा वर्ल्ड कप जिंकत विजेतेपदाची हॅट्रीक केली आहे. तसं पाहायला गेलं तर आयसीसींच्या ट्रॉफींवर ऑस्ट्रेलियाची एकहाती सत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आणि पुरूष दोन्ही संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि पुरूष संघाने आतापर्यंत आयसीसीच्या एक दोन नाहीतर तब्बल 21 ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारतामधील क्रिकेटची क्रेज पाहता आपल्याकडे खरंतरं या ट्रॉफी असायला हव्यात. मात्र शोकांतिका म्हणावी लागेल की भारताल कपिल देव आणि धोनीच्या नेतृत्त्वातच आयसीसीच्या ट्रॉफींवर नाव कोरता आलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ पुरूष संघापेक्षाही सरस आहे. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 21 ट्रॉफींमधील महिला संघाने 13 ट्रॉफी जिंकल्या आहेत. यामधील एकदिवसीय वर्ल्ड कप हे 1978, 1982, 1988, 1997, 2005, 2013 आणि 2022 यासाली एकूण सातवेळा जिंकला आहे. तर टी-20 वर्ल्ड कप 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि 2023 असा सहावेळा जिंकलाय.
ऑस्ट्रेलियाचा पुरूष संघाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या साली एकूण पाचवेळा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 2021 साली एकवेळा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. तर 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.
यंदाच्या विश्वचषकातील अजिंक्य ऑस्ट्रेलियाचा प्रवास-
ऑस्ट्रेलियाने वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. या स्पर्धेत विजयी घोडदौड पहिल्या सामन्यापासून सुरु ठेवली ती अखेरपर्यंत साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलँडला 97 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 173 धावांचं आव्हान दिलं होतं. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात बांगलादेशनं 7 गडी गमवून 107 धावांचं आव्हान दिलं होतं.
हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 18.2 षटकात पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 112 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने बिनबाद 15.5 षटकात पूर्ण केलं. चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी आणि 21 चेंडू राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 6 गडी गमवून 124 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून 16.3 षटकात पूर्ण केलं.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत 20 षटकात 4 गडी गमवून 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा करू शकला.
ऑस्ट्रेलियाचा संघ – एलिसा हिली, बेथ मूनी, अशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग, एलिसे पेरी, जॉर्जिया वारेहम, ताहिला मॅकग्राथ, जेस जोनास्सेन, मेगन स्कट, डार्सी ब्राउन
दक्षिण आफ्रिका संघ – लॉरा वॉलवॉर्ड्ट, ताझमिन ब्रिट्स, मरिझेन कॅप्प, सुने ल्यूस, क्लोइ ट्रायन, नादिन डी क्लर्क, अन्नेक बॉश, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा