RCB vs LSG 2023 : टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही नाही सुधरला ‘हा’ खेळाडू, आता IPL मधील करियरही संकटात

| Updated on: Apr 11, 2023 | 9:33 AM

RCB vs LSG IPL 2023 : टीमसाठी संकटमोचक ठरण्याऐवजी ओझ ठरतोय. त्यामुळे त्याला चालू आयपीएल सीजनमध्येही बेंचवर बसावं लागू शकतं. आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती.

RCB vs LSG 2023 : टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही नाही सुधरला हा खेळाडू, आता IPL मधील करियरही संकटात
lsg Team ipl 2023
Image Credit source: instagram
Follow us on

RCB vs LSG IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्सच्या टीममध्ये यंदाच्या सीजनमधला 15 वा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून खेळलेला एक बॉलर खूप महागडा ठरला. हा गोलंदाज खोऱ्याने धावा देत असल्यामुळेच त्याला भारतीय टीममधून बाहेर करण्यात आलं. आता आयपीएल 2023 मध्ये हा खेळाडू फ्लॉप ठरताना दिसतोय.

अशा फ्लॉप कामगिरीमुळे त्याचं आयपीएलमधील करियरही संकटात आलय. त्याला पुढच्या काही सामन्यांसाठी कदाचित टीममधून वगळलं जाऊ शकतं.

4 ओव्हरमध्ये दिल्या 53 धावा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा आवेश खान पूर्णपणे फ्लॉप ठरला. आवेश खान खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियातून बाहेर गेला. आता आयपीएलमध्ये सुद्धा त्याच्या प्रदर्शनात काही बदल झालेला नाही. आरसीबी विरुद्ध गोलंदाजी करताना आवेश खानने 4 ओव्हर्समध्ये 13.25 च्या इकॉनमीने 53 धावा दिल्या. यात 1 विकेटही त्याला घेता आला नाही.

टीम इंडियाकडून शेवटचा सामना कधी खेळला?

आवेश खान टीम इंडियाकडून आपला शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. आशिया कप 2022 मध्ये खराब प्रदर्शनानंतर 26 वर्षाच्या आवेश खानला टी 20 टीममधून बाहेर करण्यात आला. त्यानंतर तो भारतीय टी 20 टीममध्ये पुनरागमन करु शकलेला नाही.

हॉन्ग कॉन्ग विरुद्ध 4 ओव्हरमध्ये दिल्या 53 धावा

आशिया कप 2022 मध्ये आवेश खान टीम इंडियाच्या पराभवात सर्वात मोठा विलन ठरला होता. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन 1 विकेट काढला होता. त्यानंतर हॉन्ग कॉन्ग विरुद्धच्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 13.25 च्या इकॉनमीने 53 धावा देऊन 1 विकेट काढला.

टीम इंडियाकडून खेळताना परफॉर्मन्स कसा आहे?

आवेश खान टीम इंडियासाठी आतापर्यंत 15 टी 20 आणि 5 वनडे सामने खेळलाय. टी 20 मध्ये आवेश खानने 9.11 च्या इकॉनमीने 13 विकेट काढलेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 3 विकेट आहेत. आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरी लक्षात घेऊन त्याला टीम इंडियात स्थान दिलं होतं. टीम इंडियाकडून खेळताना त्याला प्रभावी कामगिरी जमली नाही.