IND vs AUS 2nd Test | अक्षर-केएलची सारखीच चूक टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत
India vs England 1st Test | टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध 190 धावांची मोठी आघाडी घेतली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला पराभवाता सामना करावा लागला. या पराभवात टीम इंडियाचे 2 खेळाडू हे गुन्हेगार ठरले आहेत.
हैदराबाद | इंग्लंड क्रिकेट टीमने टीम इंडियावर पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच 28 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंडने टीम इंडियाला ओली पोप याच्या 196 धावांच्या जोरावर 231 धावांचं दिलं होतं. मात्र टीम इंडियाला ऑलआऊट 202 धावाच करता आल्या. टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी केल्याने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र टीम इंडियाच्या 2 खेळाडूंनी केलेली एकसारखीच चूक पराभवासाठी कारणीभूत ठरली.
टीम इंडियाने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 246 च्या प्रत्युतरात 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली. या 190 धावांच्या प्रत्त्युतरात इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा केल्या. यात ओली पोप याच्या 196 धावा केल्या. पोपच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 231 धावांचं आव्हान मिळालं. ओली पोप याला 196 धावा करण्यात टीम इंडियाच्या अक्षर पटेल आणि केएल राहुल या दोघांनी मोठी मदत केली.
टीम इंडियाकडून ओली पोप याला दोन वेळा जीवनदान मिळालं. याचाच फायदा घेत ओली पोप याने ही खेळी साकारली. पोप याला इंग्लंडच्या डावातील 64 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि 95 व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर जीवनदान मिळालं. अक्षर पटेल याच्याकडून ओली पोप याला 110 धावांवर पहिलं जीवनदान मिळालं. त्यानंतर 186 धावांवर केएल राहुल याच्याकडून पुन्हा लाईफ मिळाली.
अक्षर पटेल याची पहिली चूक टीम इंडियाला 86 आणि केएल राहुल याची दुसरी चूक 10 धावांनी महागात पडली. अक्षरने ओली पॉप याची कॅच घेतली असती, तर तो 110 धावांवर आऊट झाला असता. परिणामी इंग्लंडला टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान देताच आलं नसतं. मात्र टीम इंडियाच्या दुर्देवाने आणि इंग्लंड-ओली पोपच्या सुदैवाने या या कॅच घेतल्या गेल्या नाहीत. परिणामी टीम इंडियाला सामना गमवावा लागला.
अक्षर आणि केएल टीम इंडियाच्या पराभवाचे गुन्हेगार
#KLRahul drops #OlliePope at 186, what’s going on?#INDvsENG #INDvENG #CricketTwitter #cricketfans #cricketlovers pic.twitter.com/38PwPBTFye
— Banarasi Hudga (@banarasihudga) January 28, 2024
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.