IND v SL Final : आशिया कप फायनलआधी भारत-श्रीलंका संघांना मोठा झटका, दोन स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर!

IND vs SL Final : दोन्ही संघांमधील स्टार खेळाडू फायनल सामन्याआधी बाहेर झाले आहेत. आधीच खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलेलं असताना आणखी दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले आहेत. नेमक कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या. 

IND v SL Final  : आशिया कप फायनलआधी भारत-श्रीलंका संघांना मोठा झटका, दोन स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर!
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 2:13 PM

मुंबई : आशिया कप 2023 च्या फायनल सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. भारत आणि श्रीलंका संघ फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याधी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांना मोठा झटका बसलाय. दोन्ही संघांमधील स्टार खेळाडू फायनल सामन्याआधी बाहेर झाले आहेत. आधीच खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलेलं असताना आणखी दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले आहेत. नेमक कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

कोण आहेत ते खेळाडू?

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या फायनल सामन्याआधी दोन्ही संघांबाबत वाईट बातमी समोर आलीये. दोन्ही संघाचे ऑल राऊंडर खेळाडू फायनल सामन्याआधी स्पर्धेतून बाहेर पडलेत. हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून ऑल राऊंडर महेश तीक्ष्णा आहे. महेश तीक्ष्णा याला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती. या सामन्यात महेशने पाकिस्तानच्या दोन विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारताचा ऑल राऊंडर अक्षर पटेल हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. अक्षरच्या जागी संघात वॉशिंग्टन सुंदर याला घेण्यात आलं आहे. अक्षरला बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये हाताला दुखपत झाली. भारत हा सामना हरला मात्र पटेल याने तो सामना शेवटपर्यंत नेला होता. परंतु अक्षर भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेचा फायनल सामना उद्या दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे मात्र पावसाचंही मोठं संकट सामन्यावर आहे. त्यामुळे फायनल सामन्यासाठी एक दिवक राखीव ठेवण्यात आला आहे. जर पावसाने दोन दिवस हजेरी लावली आणि दोन्ही दिवस वाया गेले तर दोन्ही संघाना विजेतेपद वाटून देण्यात येणार आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (CV), रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.