AUS vs IND: अक्षर पटेल बेस्ट फिल्डर मेडलचा मानकरी, मिचेल मार्शचा गेमचेंजर कॅच
Axar Patel Won Best Fielder Award: अक्षर पटेलने सोमवारी 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात मिचेल मार्शचा अफलातून आणि गेमचेंजर कॅच घेतला.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभूत करत वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमधील पराभवाचा वचपा घेतला. टीम इंडियाचा हा सलग सहावा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 181 धावाच करता आल्या. या दरम्यान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीमुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली होती. मात्र अक्षर पटेलने घेतलेल्या कॅचमुळे सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागला. अक्षर पटेलला त्याने घेतलेल्या या शानदार कॅचसाठी बेस्ट फिल्डरचा मेडल देण्यात आला. बीसीसीआयने या क्षणाचा व्हीडि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अक्षर पटेलचा निर्णायक कॅच
ऑस्ट्रेलियाने विजयी धावांचा पाठलाग करताना 6 धावांवर पहिली विकेट गमावली. अनुभवी डेव्हिड वॉर्नर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी विस्फोटक बॅटिंग केली. दोघांनी संधी मिळेल तेव्हा फटके मारले. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. सामना टीम इंडियाच्या हातातून निसटून जातो की काय? असं वाटत होतं. मात्र तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याचा अक्षर पटेल याने बाउंड्री लाईनआधी हवेत उडी घेत एका हाताने अप्रतिम कॅच घेतला. त्यामुळे ही जोडी फुटली. हेड आणि मिचेलने दुसऱ्या विकेटसाठी 49 बॉलमध्ये 81 धावांची भागीदारी केली.
कुलदीप यादव ऑस्ट्रेलियाच्या डावातील नववी ओव्हर टाकायला आला. या नवव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर मार्शने फटका मारला. मात्र सीमारेषेजवळ असलेल्या अक्षर पटेलने चलाखीने एका हाताने अप्रतिम कॅच घेतला. अक्षरच्या या कॅचचं सोशल मीडियावर कौतुक केलं गेलं. त्यानंतर टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने याने अक्षर पटेलला ड्रेसिंग रुममध्ये मेडल देत सन्मानित केलं.
अक्षर पटेलला बेस्ट फिल्डर मेडल
📽️ 𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗔𝘂𝘀𝘁𝗿𝗮𝗹𝗶𝗮 𝘃𝘀 𝗜𝗻𝗱𝗶𝗮
After a collective fielding effort, ‘Nu wan’ expected who will present the fielding medal 🏅 including the presenter himself 😉
WATCH 🎥🔽 – By @RajalArora | #T20WorldCup | #TeamIndia | #AUSvIND
— BCCI (@BCCI) June 25, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.