IND vs AUS | टीम इंडियात या मॅचविनरची एन्ट्री, ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार!
India vs Australia T20i Series | आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने आता सर्व संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप नंतर टी 20 विश्व करंडकासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचं पुनरागमन झालं आहे.
मुंबई | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. मात्र फॉर्मेट वेगळा असणार आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मलिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा 23 नोव्हेंबरला होणार आहे. पहिला सामना विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आला आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात घातक ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोटात दहशतीचं वातावरण आहे.
ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडिया विरुद्धची टी 20 मालिका अग्निपरीक्षा असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू हे युवा आहेत. मात्र या मालिकेतून एका अनुभवी ऑलराउंडरने दुखापतीनंतर टीममध्ये कमबॅक केलं आहे. हा खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंगने टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतो. तो कोण आहे,हे आपण जाणून घेऊयात.
अक्षर पटेल याची एन्ट्री
टीम इंडियात अक्षर पटेल याची दुखापतीनंतर एन्ट्री झाली आहे. अक्षरला दुखापतीमुळे आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला मुकावं लागलं होतं. अक्षरला आशिया कप स्पर्धेदरम्यान ही दुखापत झाली होती. दुखापतीमुळे अक्षरच्या जागी वर्ल्ड कप टीममध्ये अनुभवी आर अश्विन याला ऐनवेळेस संधी देण्यात आली होती.
अक्षर पटेल ऑस्ट्रेलिय विरुद्धच्या मालिकेनिमित्ताने 3 महिन्यांनी टी 20 मॅच खेळणार आहे. अक्षरने अखेरचा सामना हा विंडिज विरुद्ध ऑगस्ट महिन्यात खेळला होता. अक्षरने आतापर्यंत टीम इंडियासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे. अक्षरकडून सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन एब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.