Asia Cup 2023 : मोहम्मद रिझवानच्या त्या खेळीने बाबर आझम संतापला, टोपी काढून थेट फेकली Watch Video
Pakistan Vs Nepal : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात लिंबूटिंबू नेपाळने चांगलाच दम दाखवला. पाकिस्तानसमोर जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत दोघांना धावचीत केलं. मोहम्मद रिझवानच्या त्या कृतीने तर बाबर आझम चांगलाच संतापला.
मुंबई : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य असल्याने पाकिस्तान धावांचा डोंगर उभारेल यात शंका नव्हती. पण नेपाळनेही पाकिस्तानला सहजासहजी धावा करू दिल्या नाही. आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केल्याने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. सलामीला आलेले फखर झमान आणि इमाम उल हक हे स्वस्तात बाद झाल्याने मधल्या फळीची जबाबदारी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीवर आली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भागीदारी केली. पण मोहम्मद रिझवानची एक चूक नडली आणि जोडी तुटली. त्याच्या चुकीमुळे कर्णधार बाबर आझम याने संताप व्यक्त केला आणि टोपी थेट मैदानावरच फेकली.
नेमकं काय घडलं ते पाहा
नेपाळकडून संघाचं 24 वं षटक संदीप लामिछाने याच्याकडे सोपवण्यात आलं. बाबर आणि रिझवान दोघंही सेट झाले होते. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान संदीपवर होतं. पहिल्या चेंडूवर रिझवानने 1 धाव घेत बाबरला स्ट्राईक दिली. त्यानंतर बाबरने एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली. तिसऱ्या चेंडूवर रिझवानने चौकार ठोकला. त्यानंतर रिझवानला एक धाव घेणं चांगलंच महागात पडलं. खरं तर त्याचा हलगर्जीपणा नडला आणि धावचीत झाला.
रनआऊटबाबत तिसरा पंचांकडून व्हिडीओ पाहताना रिझवान त्याच्याच चुकीमुळे आऊट झाल्याचं दिसलं आणि कर्णधार बाबर आझम संतापला. त्याचा राग त्याने डोक्यावरची टोपी काढून थेट जमिनीवर फेकली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान बाबर आझमने शतकी खेळी केली.
Babar love for Rizwan❤️
After Rizwan run out Babar Azam throwing his cap 😘😘#PakvsNepal #AsiaCup2023 #AsiaCup23 Fakhar #ShaheenAfridi pic.twitter.com/eGKSUgNnMa
— Awais Fareed🇵🇰 (@awaisfareed0029) August 30, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अलि आघा, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मुहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ
नेपाळ : कुशल भुर्तेल, असिफ शेख, रोहित पौडेत, आरिफ शेख, कुशल मल्ला, दिपेंद्र सिंग ऐरी, गुलसन जा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी