Most Hundread T-20 : बाबरने इतिहास रचलाच, T-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे टॉप 5 फलंदाज
Most Hundread in T-2o Cricket : टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये 11 शतकांसह तो दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूच समावेश आहे.
मुंबई : टी- 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे युवा खेळाडू अपयशी ठरत असलेले पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम याने आपला क्लास दाखवून दिला आहे. पठ्ठ्याने टी-20 मध्ये आणखीन एक शतक करत संघाला विजय मिळवून दिला. सध्या श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या लंका प्रीमिअर लीगमध्ये गॅले टायटन्स संघाकडून त्याने शतक झळकवलं. या शतकासह बाबर आझमने इतिहास रचला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये 11 शतकांसह तो दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.
सर्वाधिक शतके करणारे टॉप -5 फलंदाज
टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याने आतापर्यंत 22 शतके केली असून तो पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानी आता बाबर आझम आला असून त्याने 1O शतके केली आहेत. तिसऱ्या स्थानी 8 मायकेल क्लिंगर, चौथ्या स्थानी डेव्हिड वॉर्नर 8 शतके आणि पाचव्या स्थानी 8 शतकांसह टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आहे.
बाबर आझम हा लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्स संघाकडून खेळतो. दोन सामन्यांमध्ये कोलंबो संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवणं गरजेचं होतं. गॅले टायटन्सविरूद्धच्या सामन्यामध्ये गॅले संघाने कोलंबोसमोर जिंकण्यासाठी 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
दरम्यान, या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझम याने 59 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत 104 धावांची दमदार खेळी केली. कोलंबो स्ट्रायकर्सने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. गेल्या चार सामन्यांमधला त्याचा हा दुसरा विजय असून ते पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर गेले आहेत.