लाहोरच्या गल्लीत रस्त्यावर खेळणाऱ्या बाबर आझमने विराट कोहलीला मागे कसं टाकलं?
आयसीसीने एकदिवसीय अर्थात वन डे रँकिंग (ODI Ranking) जाहीर केली आहे. ताज्या ICC रँकिंगनुसार टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पिछाडीवर पडला आहे.
मुंबई : आयसीसीने एकदिवसीय अर्थात वन डे रँकिंग (ODI Ranking) जाहीर केली आहे. ताज्या ICC रँकिंगनुसार टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पिछाडीवर पडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Pakistan Babar Azam) आता जगातील नंबर 1 वन डे फलंदाज ठरला आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानी घसरला आहे. (Babar Azam Pakistan captain overtakes Virat Kohli to become the No.1 batsman in the latest ICC men’s ODI rankings)
पाकिस्तानने नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 2-1 ने जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आझमने 94 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे बाबर आझमच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली.
रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर
नव्या रँकिंगनुसार बाबर आझम पहिल्या, तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने थेट चौथ्या नंबरवर मजल मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच पाचव्या स्थानावर आहे.
बाबर आझमच्या खात्यात 865 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या विराट कोहलीच्या खात्यात 857 गुण आहेत.
आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत पाकिस्तानचा सलामीवीर फकर जमानेही जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. फकर जमा सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, टॉप 20 क्रिकेटपटूंमध्ये शिखर धवनचा समावेश आहे. धवन 17 व्या स्थानावर आहे.
Babar Azam ??
The Pakistan captain has overtaken Virat Kohli to become the No.1 batsman in the latest @MRFWorldwide ICC men’s ODI rankings ? pic.twitter.com/krxoKRDsSY
— ICC (@ICC) April 14, 2021
लाहोरच्या गल्लीतून थेट पहिल्या क्रमांकावर मजल
लाहोरच्या गल्लींमध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळणारा बाबर आझम आज जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. 2003 नंतर म्हणजेच तब्बल 18 वर्षांनी एखादा पाकिस्तानी फलंदाज ICC क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. मोहम्मद युसूफनंतर बाबर आझम पहिल्यांदाच वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
12 व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात
बाबर आझम लहानपणापासून गल्ली क्रिकेट खेळतच होता. वयाच्या 12 व्या वर्षी तो पहिल्यांदा सीझन बॉलने खेळला. मोठा क्रिकेटर होण्याचं स्वप्न बाळगणारा बाबर तेव्हा निराश झाला, जेव्हा त्याची 14 व्या वर्षीय नॅशनल क्रिकेट अकादमीत निवड झाली नाही.
मात्र त्याच्या पदरी आलेली ती पहिली आणि शेवटची निराशा ठरली. कारण पुढच्याच वर्षी म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षी त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून गौरवण्यात आलं.
मागील वर्षी त्याने केवळ आणि केवळ सरावात घालवलं. दोन चुलत भावांसोबत सकाळी दहा वाजता घर सोडायचं ते रात्री 8 वाजताच परत यायचं. दिवसभर मैदानात प्रॅक्टिस करायचा.
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी
बाबर आझमची पाकिस्तानच्या अंडर 19 वर्ल्डकप संघात निवड झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सलामीला येऊन बाबरने 129 धावा ठोकल्या. विश्वचषकाच्या सर्वा सामन्यात त्याने 59.60 च्या सरासरीने 298 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या नंबरवर होता. या यादीत ज्यो रुट, बेन स्टोक आणि के एल राहुल त्याच्या पुढे होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका
बाबर आझमने पुढे देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केला. तो 15 व्या वर्षी लिस्ट ए तर 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. पाकिस्तानच्या वन डे संघात निवड होण्यापूर्वी त्याने 6 शतकं झळकावली होती. 31 मे 2015 रोजी त्याला पाकिस्तानच्या वन डे संघात स्थान मिळालं. वन डे क्रिकेटमध्ये बाबर आझमने पाकिस्तानकडून खेळताना मोठमोठ्या खेळी केल्या.
बाबर आझमची कामगिरी
26 वर्षीय बाबर आझम उजव्या हाताने फलंदाजी करतो. 80 वन डे सामन्यात त्याने 13 शतकं आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत. वन डेमध्ये त्याने 3808 धावा केल्या आहेत. दुसरीकडे कसोटीमध्ये 31 सामन्यात 5 शतकं आणि 16 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 2167 धावा आहेत.
संबंधित बातम्या
Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान