Afghanistan | अफगाणिस्तान क्रिकेट टीमची ऐतिहासिक कामगिरी, आशिया कपआधी इतर संघ अलर्ट
Bangladesh vs Afghanistan 2nd Odi : अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत आशिया कप आधी इतर संघांना मोठा इशारा दिला आहे.अफगाणिस्तान गेल्या 8 वर्षात अशी कामगिरी करणारी दुसरी टीम ठरली आहे.
चट्टोग्राम | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने चट्टोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियम इथे बांगलादेशवर विजय मिळवत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 142 धावांच्या फरकाने डब्बा गुल केला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 332 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 50 ओव्हर पूर्ण खेळताही आलं नाही. बांगलादेश 189 धांवावर 43.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. यासह अफगाणिस्तानने मोठा कीर्तीमान केला आहे.
अफगाणिस्तान टीम बांगलादेशला त्यांच्याच घरात 2015 नंतर एकदिवसीय मालिकेत पराभूत करणारी दुसरी टीम ठरली आहे. तसेच अफगाणिस्तानचा बांगलादेश विरुद्धचा पहिलाच एकदिवसीय मालिका विजय ठरला आहे. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
अफगाणिस्तानची ऐतिहासिक कामगिरी
Afghanistan Beat Bangladesh In Bangladesh In an ODI Series.
Becomes the 2nd team to win an ODI series in Bangladesh in the last 8 years.#BANvAFG pic.twitter.com/0vMioWNO1y
— Sami Sirat ?? (@JanSirat) July 8, 2023
आशिया कपआधी इतर संघांना सावधानतेचा इशारा
दरम्यान अफगाणिस्तानने बांगलादेशला घरात पराभूत करत इतर आशियाई संघाना सावध राहण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अवघ्या काही दिवसांनी आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच त्यानंतर वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमुळे मोजक्या का होईना पण अफगाणी खेळाडूंना खेळपट्टीची माहिती आहे. त्यामुळे आगामी 2 महत्वाच्या स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाला हलक्यात घेण्याची चूक प्रतिस्पर्ध्यांना महागात पडू शकते.
तिसरा सामना केव्हा?
दरम्यान बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना एकदिवसीय सामना मंगळवार 11 जूलैला खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानला हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. तर बांगलादेशचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | लिटन दास (कर्णधार), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, इबादोत हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, रशीद खान, फझलहक फारुकी, मुजीब उर रहमान, अजमातुल्ला उमरझाई आणि मोहम्मद सलीम साफी.