BAN vs AFG 3rd Odi | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा सामना मंगळवारी, कोण जिंकणार?
Bangladesh vs Afghanistan 3rd Odi | अफगाणिस्तान विरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा बांगलादेशसाठी प्रतिष्ठेचा असा असणार आहे.
चट्टोग्राम | बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा 11 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. लिटॉस दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
अफगाणिस्तान या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. अफगाणिस्तानने सलग 2 सामने जिंकत मालिकाही खिशात घातली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा तिसरा सामना जिंकून बांगादेशला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे.
अफगाणिस्तान तिसऱ्या विजयासाठी सज्ज
???'? ?? ???? ???????! ?
AfghanAtalan will be looking to extend their winning momentum & make it 3-0 when they face Bangladesh tomorrow in the third match of the ODI series. ?#AfghanAtalan | #BANvAFG2023 | #XBull pic.twitter.com/dgkrAz92Wy
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 10, 2023
तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशवर 2015 नंतर पहिल्यांदाच घरात मालिका गमावण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न बांगलादेश क्रिकेट टीमचा असणार आहे. त्यामुळे बांगलादेश आपल्या प्रयत्नात यशस्वी ठरणार की अफगाणिस्तान इतिहास रचणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
वनडे सामन्यातील पहिल्या 2 सामन्यांबाबत थोडक्यात
या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने बांगलादेशवर डकवर्थ लुईस नियमांनुसार 17 धावांची विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात तर अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवला. दुसऱ्या सामन्यात 142 धावांनी विजय मिळवत अफगाणिस्तानने मालिकाही जिंकली.
दरम्यान या एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील 2 सामने हे शुक्रवारी 14 जुलै आणि रविवारी 16 जुलै रोजी खेळवण्यात येतील.
बांगलादेश क्रिकेट टीम | लिटॉन दास (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसेन, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, रोनी तस्किन अहमद आणि शरीफुल इस्लाम.
अफगाणिस्तान क्रिकेट टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, रशीद खान, अजमातुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, फझलहक फारूकी, मोहम्मद सलीम साफी, रियाझ हसन, शाहिदुल्ला कमाल, इक्रम अकील, झिया-उर-रहमान, वफादर मोमंद, सय्यद शिरजाद आणि अब्दुल रहमान.