BAN vs AFG 3rd Odi | बांगलादेशने लाज राखली, तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय
Bangladesh vs Afghanistan 3rd Odi | बांगलादेश क्रिकेट टीमने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवत लाज राखलीय.
ढाका | बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत लाज राखली आहे. सलग 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर बांगलादेशसाठी तिसरा साामना प्रतिष्ठेचा होता. त्यामुळे बांगलादेशसमोर अफगाणिस्ताला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप देण्यापासून रोखण्याचं आव्हान होतं. या प्रयत्नात बांगलादेशला यश आलं. आधी गोलंदाजांनी अफगाणिस्तानला रोखलं. त्यानंतर फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. बांगलादेशने अशा प्रकारे 7 विकेट्सने सामना जिंकत एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड केला. मात्र अफगाणिस्तानने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानची खराब सुरुवात झाली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अझमतुल्लाह याचा अपवाद वगळता एकालाही फार वेळ टिकू दिलं नाही. अझमतुल्लाह याने 56 धावांची खेळी केली. तर कॅप्टन हशमतुल्ला शाहिदी याने 22धावांचं योगदान दिलं. या दोघांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने 45.2 ओव्हरमध्ये 126 धावा केल्या.
बांगलादेशचा तिसऱ्या सामन्यात विजय
Walton ODI Series: Bangladesh vs Afghanistan | 3rd ODIA Glimpse of the Bangladesh Batting ✨#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/Kn2j4IuDUO
— Bangladesh Cricket (@BCBtigers) July 11, 2023
बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम याने 4 विकेट्स घेतल्या. तास्किन अहमद आणि ताईजुल इस्लाम या दोघांनी 2-2 जणांना मैदानाबाहेर पाठवलं. तर शाकिब अल हसन आणि मेहदी हसन या दोघांनी 1-1 विकेट घेत शानदार साथ दिली.
बांगलादेशची बॅटिंग
आता बांगलादेश लाज राखण्यासाठी मैदानात उतरली. बांगलादेशला 127 धावांचं माफक आव्हान मिळालं. मात्र बांगलादेशची सुरुवात खास राहिली नाही. बांगलादेशने पहिली विकेट 2 तर दुसरी 28 धावांवर गमावली. मोहम्मद नाईम झिरो आणि नजमूल 11 धावा करुन बाद झाले. त्यानंतर शाकिब अल हसन 39 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. मात्र शाकिब आऊट झाला. त्यामुळे बांगलादेशची 17.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 89 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन लिटॉन दास आणि तॉहिद हृदॉय या जोडीने बांगलादेशला विजयी केलं.
लिटॉन याने 60 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर तॉहिदने 19 बॉलमध्ये नाबाद 22 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी याने 2 आणि मोहम्मद नबी याने 1 विकेट घेतली.
दरम्यान आता एकमेव कसोटी, वनडे सीरिजनंतर आता 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, अजमातुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि झिया-उर-रहमान.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | लिटॉन दास (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, शरीफुल इस्लाम, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम.