BAN vs AFG | मेहदी हसन आणि नजमूल शांतो जोडीची ऐतिहासिक कामगिरी, आशिया कपमध्ये कीर्तीमान
Mehidy Hasan Miraz and Najmul Hossain Shanto | बांगलादेशच्या मेहदी हसन मिराज आणि नजमूल होसेन शांतो या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा झोड झोड झोडत मोठा कारनामा केलाय.
लाहोर | आशिया कप 2023 मधील चौथा सामना खेळवण्यात येत आहे. ग्रुप बीमधील बांगालदेश विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशची आश्वासक सुरुवात झाली. मोहम्मद नईम आणि मेहंदी हसन या दोघांनी 60 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर नईम 28 धावांवर बाद झाला. बांगलादेशला त्यानंतर 11 व्या ओव्हरमध्येच दुसरा झटका लागला. तॉहिद हृदाय आला तसाच गेला.तॉहिदला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे बांगलादेशनची 2 बाद 63 अशी स्थिती झाली.
त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि नजमूल शांतो या जोडीने बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांनी बांगलादेशला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी अर्धशतकं ठोकली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके मारले. त्यानंतर मेहदी हसन याने खणखणीत शतक ठोकलं. मेहदीने 115 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. मेहदीच्या वनडे करियरमधील हे दुसरं शतक ठरलं.
ऐतिहासिक भागीदारी मात्र दुर्देवी अंत
मेहदीला शतकानंतर मोठी धावसंख्या होती. त्यानुसार मेहदी खेळत होता. मेहदीने शतकानंतर एक धाव घेताच आणखी एक वैयक्तिक विक्रम केला. मेहदीच्या वनडे करियरमधील सर्वोच्च धावसंख्या त्याने केली. याआधी मेहदीचा 100 नाबाद हा वनडे हायस्कोअर होता. मेहदीने टीम इंडिया विरुद्ध 100 नाबाद धावा केल्या होत्या. मेहदी शानदार पद्धतीने खेळत होता. मात्र मध्येच त्याला दुखापत झाली. त्यामुळे मेहदी रिटायर्ड हर्ट झाला आणि मैदानाबाहेर जावं लागलं. मेहदीने 119 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 112 धावा केल्या.
मेहदी रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर अनुभवी मुशफिकुर रहीम मैदानात आला. मेहदीच्या पाठोपाठ नजमूल शांतो यांनेही शतक ठोकलं. शांतोने 101 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने शतक केलं. नजमूलच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. मात्र शांतोच्या खेळीला 104 धावांवर ब्रेक लागला. नजमूल दुर्देवी ठरला तर वावगं ठरणार नाही. कारण कि नजमूल रिव्हर्स स्वीप मारुन चोरटी धाव घेण्यासाठी क्रिजमधून निघाला. मात्र त्या दरम्यान नजमूलचा धावताना पाय घसरला. नजमूल पडला. त्यामुळे नजमूलला अफगाणिस्तान विकेटकीपरने स्ट्राईक एंडवर रनआऊट झाला. अशा प्रकारे बांगलादेशच्या या दोन्ही शतकवीर फलंदाजांच्या खेळीचा द एन्ड झाला.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.