BAN vs AFG Test | अफगाणिस्तानवर 546 धावांनी रेकॉर्ड विजय, बांगलादेशचा महारेकॉर्ड
Bangladesh vs Afghanistan Test | बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तानवर विजय मिळवत कसोटी क्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय.
ढाका | बांगलादेश टीमने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन हे शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यातील चौथ्या दिवशी बांगालदेशने अफगाणिस्तानवर तब्बल 546 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला. बांगलादेशचा कसोटी क्रिकेट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.
बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी
Biggest margin win in 5-day Tests (by 546 runs) and third biggest margin victory in the history of Test cricket#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/SXtkO4MOWl
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
बांगलादेशने अफगाणिस्तानने विजयााठी 662 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 33 ओव्हरमध्ये 115 धावांवर गुंडाळलं. अफगाणिस्तानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर रहमत शाह याने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. तर कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी रिटायर्ड हर्ट झाल्याने 13 धावांवर माघारी परतला. तसेच करिम जनत याने 18 धावांचं योगदान दिलं. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
बांगलादेशकडून तास्किन अहमद याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शोरीफुल अस्लम याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मेहदी हसन आणि एबादोत होसेन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतला.
बांगलादेश अफगाणिस्तान कसोटी सामन्याचा धावता आढावा
Walton Test Match: Bangladesh vs Afghanistan | Only Test | Day 04
Bangladesh won by 546 runs.
Full Match Details: https://t.co/MDvtIwN35K#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/sk24j4tteZ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
दरम्यान त्याआधी बांगलादेशने पहिल्या डाव 382 धावांवर आटोपला. त्यानंतर अफगाणिस्तानला पहिल्या डावात अवघ्या 146 धावाच करता आल्याने बांगलादेशला 236 धावांची मोठी आघाडी मिळाली. बांगलादेशने तिसऱ्या दिवशी दुसरा डाव 425 धावांवर घोषित करत अफगाणिस्तानला 662 धावांचे आव्हान दिले. मात्र बांगलादेशसमोर अफगाणिस्तानने शरणागती पत्कारली.
नजमूल शांतो चमकला
दरम्यान बांगलादेशच्या नजमूल शांतो याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. नजमूलने सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकलं. नजमूल दोन्ही डावात शतक करणारा मोमिनूल हक याच्यानंतरचा पहिलाच आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला.
नजमूल शांतो ‘मॅन ऑफ द मॅच’
Walton Test Match: Bangladesh vs Afghanistan | Only Test
Player of the Match:Najmul Hossain Shanto (146 & 124 Runs)?
Full Match Details: https://t.co/MDvtIwN35K#BCB | #Cricket | #BANvAFG pic.twitter.com/N1x40zibMA
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2023
नजमूल शांतो याने पहिल्या डावात 175 बॉलमध्ये 23 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने आणि 83.43 च्या स्ट्र्राईक रेटने 146 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात नजमूलने 151 चेंडूत 15 चौकारांसह 124 धावा केल्या.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | लिट्टन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, महमुदुल हसन जॉय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम आणि इबादोत हुसेन.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, अब्दुल मलिक, रहमत शाह, नासिर जमाल, अफसर झझाई (विकेटकीपर), करीम जनात, अमीर हमजा, झहीर खान, निजत मसूद आणि यामिन अहमदझाई.