ढाका | बांगलादेशने वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड टीमला पराभवाची धुळ चारली आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात बागंलादेशने इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेश टीमने ही 3 सामन्यांची मालिका जिंकली आहे. बांगालदेश आता या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 118 धावांचं आव्हान बांगालदेशने 7 चेंडू राखून 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
बांगलादेशकडून नाजमूल शांतो आणि तास्किन अहमद या जोडीने बांगलादेशला विजयापर्यंत पोहचवलं. तास्किनने सलग 2 चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला. नाजमूल शांतो याने 47 बॉलमध्ये सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार ठोकले. त्यानंतर मेहंदी हसन याने 20 तर तौहीद हृदयॉय याने 17 धावा केल्या. कॅप्टन लिटॉन दास आणि रॉनी तालुकदार या सलामी जोडीने प्रत्येकी 9 धावांचं योगदान दिलं.
इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रेहान अहमद, मोईन अली आणि सॅम कुरेन या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बागंलदेशचा 2-0 ने मालिका विजय
A vital knock from Najmul Hossain Shanto helps Bangladesh to a win against England ?
They take an unassailable 2-0 lead in the T20I series ?#BANvENG | ?: https://t.co/U5vJBPZYYx pic.twitter.com/G7ocll5Rs0
— ICC (@ICC) March 12, 2023
त्याआधी बांगसादेशने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडले. इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हर पूर्ण खेळल्या. मात्र त्यांना 117 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक 28 धावा केल्या. फिलिप सॉल्टने 25 रन्स केल्या. मोईन अली याने 15 तर सॅम कुरने याने 12 धावा जोडल्या. या व्यतिरिक्त बांगलादेशच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
बांगलादेशकडून मेहदी हसन याने सर्वाधिक 4 विकेट् घेतल्या. तर तास्किन अहमद, मुस्तफिजर, कॅप्टन शाकिब अल हसन आणि हसन मुहमद या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा मंगळवारी 14 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा बांगलादेश दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर बांगलादेश इंग्लंडला क्लिन स्वीपच्या तयारीत असेल, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास (विकेटकीपर), रॉनी तालुकदार, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदयॉय, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, डेविड मलान, बेन डकेट, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रेहान अहमद आणि जोफ्रा आर्चर.