BAN vs IND | टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी बांगलादेश संघाची घोषणा, या स्टार बॉलरला डच्चू
India Women tour of Bangladesh 2023 | बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेश टीमची घोषणा करण्यात आली आहे.
ढाका | वूमन्स टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या बांगलादेश दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी 2 जुलै रोजी वूमन्स टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यातील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी हरमनप्रीत कौर हीच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर स्मृती मंधाना हीला उपकर्णधार केलंय. टी 20 सीरिजला 9 तर वनडे मालिकेला 16 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता टी 20 सीरिजाठी बांगलादेश वूमन्स टीमची घोषणा करण्यात आली आहे.
एकूण 3 सामन्यांची ही टी 20 मालिका आहे. या मालिकेत निगार सुल्ताना हीला बांगालदेशच्या कर्णधारपदाची जबाबादारी देण्यात आली आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी बांगलादेश टीम
निगार सुल्ताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), नाहिदा अख्तर, दिलारा अख्तर, शाथी रानी, शमीमा सुल्ताना, शोभना मोस्तरी, मुर्शिदा खातून, शोर्ना अख्तर, रितु मोनी, दिशा बिस्वास, मारुफा अख्तर, संजीदा अख्तर माघला, राबेया , सुल्ताना खातून, सलमा खातून आणि फाहिमा खातून.
राखीव खेळाडू | फरगाना हक पिंकी, लता मंडल, शर्मिन एक्टर सुप्ता आणि फरिहा इस्लाम त्रिस्ना.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, देविका वैद्य,अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, उमा चेत्री (विकेटकीपर), राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी आणि मिन्नू मणी.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 9 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
दुसरा सामना, मंगळवार 11 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
तिसरा सामना, गुरुवार 13 जुलै, दुपारी 1 वाजून 30 मिनिटं.
दरम्यान या टी 20 मालिकेनंतर 16, 19 आणि 22 जुलै रोजी अनुक्रमे वनडे सीरिजमधील सामने होणार आहेत. बांगलादेशने अजून या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही.
बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे, रविवार 16 जुलै, सकाळी 9 वाजता.
दुसरी वनडे, बुधवार 19 जुलै, सकाळी 9 वाजता.
तिसरी वनडे, शनिवार 22 जुलै, सकाळी 9 वाजता.