BAN vs NZ 2nd Test | न्यूझीलंडकडून बांगलादेशचा कार्यक्रम, 172 धावांमध्ये पॅकअप
Bangladesh vs New Zealand 2nd Test | न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर आणि धारदार बॉलिंगसमोर बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडने बांगलादेशला 172 धावांवर गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंग केली.
ढाका | बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमवर विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दणक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी यजमान बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम केलाय. न्यूझीलंडने धारदार बॉलिंगच्या जोरावर बांगलादेशला 172 धावांवर ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात नक्की काय काय झालं, हे आपण जाणून घेऊयात.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेश कॅप्टन नजमूल हुसेन शांतो याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशच्या खेळाडूंनी आपल्या कर्णधाराचा निर्णय चूकीचा ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नागीन डान्स स्पेशालिस्ट बांगलादेशला ठराविक अंतराने धक्के देत थेट ऑलआऊटच केलं न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशला कुठेही कमबॅक करण्याची संधी दिली नाही. काही फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार काही करता आलं नाही.
बांगलादेशकडून मुशिफिकुर रहीम याने सर्वाधिक 35 धावा केल्या. मुशिफिकुर रहीमला न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आऊट केलं नाही, तर तो स्वत:च्या चुकीमुळे आऊट झाला. मुशिफिकुरने बॉल मारल्यानंतर तो हाताने अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बाद घोषित करण्यात आलं. मुशिफिकुरशिवाय शहादत हौसेन याने 31 धावांचं योगदान दिलं. मेहदी हसन मिराज याने 20 धावा केल्या. महमुदल हसन जॉय याने 14, नईम हसन याने 13 आणि शोरिफूल इस्लमा याने 10 धावा जोडल्या.
बांगलादेश ऑलआऊट
The hosts all-out for 172 🏏
Glenn Phillips (3-31), Mitchell Santner (3-65), Ajaz Patel (2-54) and Tim Southee (1-0) in the wickets. Follow play LIVE and free in NZ on the ThreeNow app or at https://t.co/wkAllxX9Gf 📺 LIVE scoring https://t.co/nRgzu3oxpZ 📲 pic.twitter.com/ezTWtpeZGB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 6, 2023
या शिवाय 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅप्टन शांतो 9, झाकीर हसन 8, नुरल हसन 7, ताईजुल इस्लाम 6 आणि मोमिनुल याने 5 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. अझाज पटेल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कॅप्टन टीम साऊथी याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम आणि शरीफुल इस्लाम.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन आणि एजाज पटेल.