BAN vs NZ 2nd Test Day 1 | ढाक्यात गोलंदाजांचा धमाका, पहिल्याच दिवशी 15 विकेट्स
Bangladesh vs New Zealand 2nd Test Day 1 Stumps | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस हा पूर्णपणे गोलंदाजांचा राहिला. बांगलादेश आणि न्यूझीलंड दोन्ही टीमच्या गोलंदाजांनी धमाकेदार बॉलिंग केली.
ढाका | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामधील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसात एकूण 15 विकेट्स गेल्या. या 15 पैकी 13 विकेट्स या स्पिन गोलंदाजांनी घेतल्या. बांगलागदेश टीम आधी 172 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 12.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 55 धावा केल्या.
ढाक्यातील खेळपट्टी ही कायमच फलंदाजांसाठी डोकेदुखी आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आली आहे. आधी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगालादेशची दाणादाण उडवली. मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स आणि एजाज पटेल या तिघांनी मिळून 8 विकेट्स घेतल्या. तर त्यानंतर बांगलादेशच्या तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन या दोघांनी न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला.
सामन्याबाबत थोडक्यात पण सविस्तर
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यजमान बांगलादेशकडून मुशफिकुर रहिम याने 35 आणि शहादत हुसेन याने 31 धावा केल्या. या दोघांनाच बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करता आल्या. तसेच मेहदी हसन याने 20 धावा जोडल्या. मात्र इतरांना काही विशेष असं करता आलं नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशने नांग्या टाकल्या. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव हा 66.2 ओव्हरमध्ये 172 धावांवर आटोपला.
बांगलादेशला झटपट गुंडाळल्यानंतर न्यूझीलंड टीम मोठी आघाडी घेण्याच्या तयारीने मैदानात आली. मात्र झालं उलटंच. बांगलादेशच्या गोलंदाजांनी जोरदार कमॅबक केलं. टॉम लॅथम 4 आणि डेव्हॉन कॉनव्हे 11 धावा करुन आऊट झाले. केन विलियमसन 13, हॅनरी निकोलस 1 आणि टॉम ब्लंडेल 12 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर हा पहिल्या दिवसअखेर 5 विकेट्स गमावून 55 असा राहिला. मिचेल 12 आणि फिलिप्स 5 धावांवर नाबाद राहिले.
पहिल्या दिवसाचा गेम ओव्हर
Dutch-Bangla Bank Test Series 2023 Bangladesh 🆚 New Zealand 🏏 | 2nd Test
Stumps | Day 01 | New Zealand trail by 117 runs
Full Match Details: https://t.co/T3QHK95rOi#BCB | #Cricket | #BANvNZ pic.twitter.com/5BKshMFvWu
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 6, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम आणि शरीफुल इस्लाम.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन आणि एजाज पटेल.