PAK vs BAN: देशात तणावाची स्थिती, बांगलादेश टीम पाकिस्तानमध्ये दाखल
Pakistan vs Bangladesh Test Series 2024: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अखेर बांगलादेश संघ पाकिस्तानात पोहचला आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम पाकिस्तान विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश क्रिकेट टीम या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात पोहचली आहे. बांगलादेश या पाकिस्तान दौऱ्यात फक्त नि फक्त कसोटी मालिकाच खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग असणार आहे. शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. नजमूल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळणार आहे. उभयसंघातील दोन्ही सामने हे रावळपिंडी आणि कराची येथे होणार आहेत.
बांगलादेशात अराजकता
बांगलादेशात तणावपूर्ण स्थिती आहेत. त्यामुळे क्रिकेट टीम ही 4 दिवसआधीच पाकिस्तानात दाखल झाली आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे क्रिकेट टीमला आवश्यक सराव करता आला नाही. त्यामुळे बांगलादेश टीम वेळेआधीच पोहचली आहे, जेणेकरुन सरावाला वेळ देता येईल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंचे पाकिस्तानात पोहचल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बांगलादेश टीम लाहोरमध्ये आहे. उभयसंघातील सलामीच सामना हा 21 ऑगस्टपासून होणार आहे. त्याआधी बांगलादेश लाहोरमधील गद्दाफी आणि रावळपिंडी स्टेडिममध्ये 3-3 दिवस सराव करणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते.
बांगलादेशचा ‘झिरो बॅलन्स अकाउंट’
बांगलादेशला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजय मिळवण्यात यश आलेलं नाही. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील ही सातवी कसोटी मालिका असणार आहे. याआधीच्या एकूण 6 कसोटी मालिकांमध्ये पाकिस्तानचाच विजय झाला आहे. आतापर्यंत उभयसंघामध्ये एकूण 6 मालिकांमध्ये 13 सामने खेळले आहेत. बांगलादेशला या 13 मधून फक्त 1 सामना अनिर्णित सोडवण्यात यश आलं आहे. तर इतर 12 सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला आहे.
बागंलादेश पाकिस्तानात दाखल
Bangladesh’s Team is heading to Pakistan for the #WTC25 clash. The first Test begins on August 21 in Rawalpindi and the second on August 30 in Karachi.#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PCB #BANvsPAK pic.twitter.com/1GMmCNs3ny
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 12, 2024
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.