Retirement : दिग्गज खेळाडू घरच्या मैदानात खेळणार शेवटचा कसोटी सामना, कोण आहे तो?

Test Cricket : दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार आपल्या घरच्या मैदानात अखेरचा सामना खेळून कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे. कोण आहे तो?

Retirement : दिग्गज खेळाडू घरच्या मैदानात खेळणार शेवटचा कसोटी सामना, कोण आहे तो?
shakib al hasan and virat kohli test cricketImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 4:45 PM

बांग्लादेश क्रिकेट टीमला भारत दौऱ्यात टीम इंडियाकडून कसोटी आणि टी 20I मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता एका बाजूला टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर तिथे बांगलादेश दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याचा समावेश करण्यात आला आहे. शाकिब टी 20I नंतर त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळून निवृत्त होण्यासाठी सज्ज झाला आहे. शाकिब मायदेशातच अखेरचा सामना खेळणार आहे.

शाकिबला घरच्या मैदानात निरोप मिळणार

शाकिब अल हसन याने भारत दौऱ्यावर असताना टी 20I क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच घरच्या मैदानात अखेरचा सामना खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबची ही इच्छा पूर्ण केली आहे. मला सुरक्षा दिल्यास ढाक्यात अखेरचा सामना खेळेन असं शाकिबने तेव्हा म्हटलं होतं. शाकिबवर एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे शाकिबने त्याला सुरक्षा पुरवल्यास तो अखेरचा सामना ढाक्यात खेळेल, असं स्पष्ट केलं होतं.

दक्षिण आफ्रिका बांगलादेश दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 21 ऑक्टोबरपासून ढाक्यातील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमध्ये होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा 29 ऑक्टोबरपासून होणार आहे. नजमुल हुसेन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर पहिल्या सामन्यात टेम्बा बावुमा याला दुखापत झाल्याने तो बाहेर झाला आहे. त्यामुळे टेम्बाच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे.

हे सुद्धा वाचा

बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेविड बेडिंघम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हीस, टोनी डी झॉर्जी, केशव महाराज, एडन मार्करम (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, डेन पॅटर्सन, डेन पिएड्ट, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रयान रिकेल्टन (विकेटकीपर) आणि कायल वेरिन (विकेटकीपर).

पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास, झाकेर अली, मेहदी हसन, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.