बांग्लादेश-दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर, दुसऱ्या दिवशी झालं असं काही

| Updated on: Oct 22, 2024 | 8:44 PM

बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाक्यात सुरु आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. कारण दुसऱ्या दिवशीच बांगलादेशला दुसरी इनिंग खेळावी लागत आहे.

बांग्लादेश-दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर, दुसऱ्या दिवशी झालं असं काही
Image Credit source: Twitter
Follow us on

बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका हे दोन संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आमनेसामने आले आहेत. पहिला कसोटी सामना ढाक्यात सुरु असून या सामन्यावर दक्षिण अफ्रिकेची पकड दिसून येत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागले. कारण बांगलादेशचा संपूर्ण संघ 106 या धावसंख्येवर तंबूत परतला. त्यामुळे पहिल्याच दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला फलंदाजी आली. दक्षिण अफ्रिकेने सावध पण चांगली फलंदाजी केली. तसेच पहिल्या डावात सर्व गडी बाद 308 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेकडे 202 धावांची मजबूत आघाडी होती. ही आघाडी मोडून दक्षिण अफ्रिकेला विजयी धावांचं आव्हान बांगलादेशला द्यावं लागणार आहे. बांगलादेशने ही आघाडी मोडून काढताना तीन गडी गमावले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 3 गडी बाद 101 धावा केल्या आहेत. अजूनही दक्षिण अफ्रिकेकडे 101 धावांची आघाडी आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ही आघाडी मोडून काढणं कठीण जाणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महमुदुल हसन जॉय नाबाद 38, तर मुशफिकुर रहमान नाबाद 31 धावांवर खेळत आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यात अजूनही तीन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. खरंच या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचं पारडं जड दिसत आहे. बांगलादेशच्या पहिल्या सत्रात 3-4 विकेट गेल्या तर विजयी धावांचं आव्हान फारच कमी असेल. त्यामुळे उर्वरित दिवसात आव्हान गाठणं सहज शक्य आहे. दरम्यान दक्षिण अफ्रिकेकडून विकेटकीपर वेरेयनने 144 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. तर वियान मुल्डरने 112 चेंडूत 8 चौकार मारत 54 धाव केल्या.

दक्षिण अफ्रिकेने दिलेली आघाडी मोडून काढताना बांगलादेशचा डाव गडगडला. शदमन इस्लाम आणि मोमिनुल हक हे स्वस्तात बाद झाले. मोमिनुल हकला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या डावात कागिसो रबाडाने 2, तर केशव महाराजने 1 गडी बाद केला. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून हे दोन्ही संघ बाद झाले आहेत. कारण या दोन्ही संघांची विजयी टक्केवारी फारच कमी आहे. अव्वल दोन संघात येणं कठीण आहे.