BAN vs SA 2nd Test : बांगलादेश-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, दुसरा सामना केव्हा?
Bangladesh vs South Africa 2nd Test Live Score Streaming : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मंगळवार 29 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेने यासह आशिया खंडात तब्बल 10 वर्षांनी कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तर बांगलादेशसमोर सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल? कुठे पाहता येईल? जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना केव्हा?
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना कुठे?
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना हा झहुर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे आयोजित करण्यात आला आहे.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना टीव्हीवर भारतात दाखवण्या येणार नाही. तर फॅनकोड या एपद्वारे हा सामना मोबाईलवर पाहायला मिळेल.
दक्षिण अफ्रीका टीम: एडेन मार्करम (कर्णधार), टोनी डी ज़ोरज़ी, ट्रिस्टन स्टब्स, डेविड बेडिंघम, रयान रिकेल्टन, मैथ्यू ब्रीट्जके, काइल वेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, केशव महाराज, डेन पिड्ट, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, डेन पैटरसन, सेनुरान मुथुसामी आणि डेवाल्ड ब्रेव्हीस.
बांग्लादेश टीम: महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), मुश्फिकुर रहीम, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, झाकेर अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद, जाकिर हसन, खालिद अहमद , हसन मुराद आणि नाहिद राणा.