Test Cricket : कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, पहिल्या सामन्यातून कॅप्टन ‘आऊट’
Test Cricket : दुखापतीमुळे कर्णधाराला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. कर्णधाराच्या अनुपस्थितीत अनुभवी खेळाडूला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. बांगलादेशने या दौऱ्यातील कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. तर त्यानंतर इंडिया-बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी20i मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेश या दौऱ्यांतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मालिकेला 21 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यातून कॅप्टन टेम्बा बावुमा बाहेर झाला आहे. टेम्बाला दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे.
टेम्बा टीमसह बांगलादेशला रवाना होणार आहे. मात्र तो पहिल्या सामन्यात सहभागी होणार नाही. मात्र टेम्बाचे दुसऱ्या आणि अंतिम टेस्टपर्यंत फिट होण्याचे प्रयत्न असणार आहेत. टेम्बावर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असणार आहे. टेम्बाच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बाच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिस याचा समावेश करण्यात आला आहे. डेवाल्डची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. तसेच नांद्रे बर्गर याच्या जागी लुंगी एन्गीडी याचा समावेश करण्यात आला आहे. नांद्रे बर्गर हा देखील दुखापतीच्या जाळ्यात फसला आहे.
आयर्लंड विरूद्धच्या मालिकेत दुखापत
दरम्यान टेम्बाला आयर्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. टेम्बाला दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्याने त्याला फिल्डिंग करता आली नव्हती. त्यानंतर टेम्बाला या मालिकेतूनही बाहेर व्हावं लागलेलं.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 21 ते 25 ऑक्टोबर, शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
दुसरा सामना, 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, चिटगाव
दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का
A new Proteas captain was named for the first #BANvSA Test after Temba Bavuma was ruled out.#WTC25https://t.co/KwUsYAol2t
— ICC (@ICC) October 11, 2024
बांगलादेश दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेविड बेडिंघम, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हीस, टोनी डी झॉर्जी, केशव महाराज, एडेन मार्करम (पहिल्या कसोटीसाठी कर्णधार), वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, डेन पॅटर्सन, डेन पिएड्ट, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रयान रिकेल्टन (विकेटकीपर) आणि कायल वेरिन (विकेटकीपर).