BAN vs ZIM 5th T20I : झिंबाब्वेचा अखेरच्या सामन्यात धमाका, बांगलादेशचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा
Bangladesh vs Zimbabwe 5th T20I Highlights In Marathi : झिंबाब्वेने पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात उलटफेर केलाय. झिंबाब्वेने बांगलादेशचा 8 विकेट्सने धुव्वा उडवलाय.
आयर्लंडने पाकिस्तान क्रिकेट टीमवर 10 मे रोजी पाकिस्तानवर पहिल्या टी 20 सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. आयर्लंडने पाकिस्तानला दणका दिल्यानंतर आता आणखी एक टीम उलटफेरची शिकार झाली आहे. झिंबाब्वेने बांगलादेशवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवत शेवट गोड केला आहे. झिंबाब्वेने पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर मात केली. बांगलादेशने ही मालिका 4-1 ने जिंकली. मात्र त्यानंतरही झिंबाब्वेच्या एकमेव विजयाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 157 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशने झिंबाब्वेला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. झिंबाब्वेने हे आव्हान 9 बॉल राखून आणि 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. झिंबाब्वेने 18.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. कॅप्टन सिंकदर रझा आणि ओपनर ब्रायन बेनेट हे दोघे झिंबाब्वेच्या विजयाचे नायक ठरले. दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे झिंबाब्वेचा विजय सोपा झाला. तसंच झिंबाब्वेने या विजयासह 5-0 ने क्लिन स्वीपचा धोका टाळला.
ओपनर ब्रायन बेनेट याने 49 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 142.86 च्या स्ट्राईक रेटने 70 धावांची खेळी केली. तर तदिवानाशे मारुमणी 1 रन करुन माघारी परतला. त्यानंतर सिंकदर रझा आणि जोनाथन कॅम्पबेल या जोडीने झिंबाब्वेला विजयापर्यंत पोहचवलं. सिंकदरने 46 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबद 72 धावांची खेळी केली. तर जोनाथनने नाबाद 8 धावा करत सिंकदरला चांगली साथ दिली. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मोहम्मद सैफुद्दीन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
झिंबाब्वेचा बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय
Brian Bennett and Sikandar Raza power Zimbabwe to a consolation eight-wicket win 👏#BANvZIM pic.twitter.com/ZPeqBvU4F5
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) May 12, 2024
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तन्झीद हसन, सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, शकिब अल हसन, जाकेर अली (विकेटकीपर), महमुदुल्लाह, मोहम्मद सैफुद्दीन, महेदी हसन, रिशाद हुसेन आणि मुस्तफिजुर रहमान.
झिंबाब्वे प्लेईंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कॅप्टन), क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रायन बेनेट, तदिवानाशे मारुमणी, जोनाथन कॅम्पबेल, शॉन विल्यम्स, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, फराज अक्रम, वेलिंग्टन मसाकादझा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.