BAN W vs IND W | बांगलादेशचं सुपर कमबॅक, टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी, तिसरा सामना टाय
Bangladesh Women vs India Women 3rd ODI | बांगलादेशने टीम इंडियाला तिसऱ्या वनडेत विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं.
ढाका | शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेला बांगलादेश वूमन्स विरुद्ध टीम इंडिया वूमन्स तिसरी वनडे टाय झाली आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार टीम इंडियाने विजयी धावांचा पाठलाग केला. टीम इंडियाने 49 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 223 रन्स केल्या.त्यामुळे शेवटच्या 50 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज होती.
टीम इंडियाने पहिल्या 2 बॉलवर सलग 1-1 अशी धाव घेतली. आता टीम इंडियाला विजयासाठी 4 बॉलमध्ये 1 धावेची तर बांगलादेशला 1 विकेटची गरज होती. मात्र या 50 ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर मेघना सिंह कॅच आऊट झाली आणि मॅच टाय झाली. त्यामुळे 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत राहिली.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाची 226 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. शफाली वर्मा आणि यास्तिका भाटीया या दोघी झटपट आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 बाद 32 अशी स्थिती झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि हर्लिन दओल या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. त्यानंतर स्मृती 59 धावांवर आऊट झाली.
कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने निराशा केली. कौर 14 धावांवर माघारी परतली. हर्लिनकूडन मोठी अपेक्षा होती, त्यानुसार ती खेळतही होती. मात्र हर्लिनही 77 धावांवर माघारी परतली. दीप्ती शर्मा चोरटी धाव घेताना रन आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाची 6 बाद 192 अशी स्थिती झाली.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्ज हीने एक बाजू लावून धरली होती. मात्र अमनजोत कौर 10 वर आऊट झाली. स्नेह राणा आणि देविका वैद्य दोघी आल्या तशाच गेल्या. दोघींनीही ऐनवेळेस माती खाल्ली. दोघींना भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 47.4 ओव्हरमध्ये 9 विकेट्स 217 रन्स अशी झाली.
आता हातात 1 विकेट आणि विजयासाठी 9 धावा हव्या होत्या. जेमिमाह मैदानात असल्याने विजयाच्या आशा कायम होत्या. जेमिमाह आणि मेघना या दोघांनी सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत ओढला. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज होती. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा केल्या. त्यामुळे स्कोअर लेव्हल झाला. पण तिसऱ्या बॉलवर मेघना सिंह कॅच आऊट झाली आणि बांगलादेशला मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलं.
तिसरी वनडे मॅच टाय
India Women’s Tour of Bangladesh 2023 | 3rd ODI Match
Match Tied
Full Match Details: https://t.co/kX8fJqC45k#BCB | #Cricket | #BANWvINDW pic.twitter.com/PkMU4vwTT8
— Bangladesh Cricket (@BCBtigers) July 22, 2023
बांगलादेशची बॅटिंग
त्याआधी बांगलादेश टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. बांगलादेशच्या हातात विकेट्स खूप होत्या, मात्र त्याचा त्यांना फायदा घेता आला नाही. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. फरगाना हक 160 बॉलमध्ये 7 फोरसह 107 धावा करुन रन आऊट झाली. तर शमीमा सुल्ताना हीने 52 रन्स केल्या.
कॅप्टन निगर सुल्ताना हीने 24 धावांचं योगदान दिलं. रितू मोनी 2 धावा करुन माघारी परतली. तर शोभना मोस्तरी हीने नाबाद 23 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्नेह राणा हीने 2 विकेट्स घेतल्या. तर देविका वैद्य हीच्या खात्यात 1 विकेट गेली.
Top effort from the Indian bowlers to restrict ?? to 2️⃣2️⃣5️⃣!
?? requires 2️⃣2️⃣6️⃣ to win the series 2️⃣-1️⃣!?#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL #BANvIND pic.twitter.com/GPbchndiUb
— Mumbai Indians (@mipaltan) July 22, 2023
वूमन्स बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमीमा सुलताना, फरगाना हक, शोभना मोस्तारी, लता मंडल, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अक्टर, फहिमा खातून, सुलताना खातून आणि मारुफा अक्तर.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, देविका वैद्य आणि मेघना सिंग.