Bangladesh: 14 दिवस, 2 सामने आणि 16 खेळाडू, कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा

| Updated on: Aug 11, 2024 | 8:57 PM

Bangladesh Cricket Team: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. देशातील तणावपूर्ण स्थितीमुळे संघ जाहीर करण्यास विलंब झाला आहे.

Bangladesh: 14 दिवस, 2 सामने आणि 16 खेळाडू, कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा
bangaldesh cricket team
Image Credit source: bangaldesh x account
Follow us on

बांगलादेशमध्ये सध्या भयंकर परिस्थिती आहे. अशात बांगलादेश काही दिवसांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेश पाकिस्तान दौऱ्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग असणार आहे. पाकिस्तानने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

नजमुल हुसैन शांतो हा पाकिस्तान दौऱ्यात बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा सामना हा 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर दरम्यान कराची येथे होणार आहे. तर वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद हा मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे तस्कीन थेट दुसऱ्या सामन्यातच मैदानात उतरणार आहे. तसेच तस्कीन हा पाकिस्तान ए विरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 4 दिवसांचा असणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर, कराची

कसोटी मालिकेसाठी बांगलादेशची घोषणा

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम: शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.