Asia Cup 2023 Super 4 आधी टीमला मोठा झटका, हा बॅट्समन ‘आऊट’

Asia Cup 2023 | आशिया कप 2023 साठी ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पाकिस्ताननंतर टीम इंडियाने धडक दिली आहे. त्यानंतर आता एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. मोठा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

Asia Cup 2023 Super 4 आधी टीमला मोठा झटका, हा बॅट्समन 'आऊट'
भारताने सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन संघांचा पराभव केला आहे. पाकिस्तान संघावर तर 228 धावांनी विजय मिळवलेला. त्यानंतर श्रीलंकेविरूद्धच्या रोमांंचक सामन्यामध्ये गोलंदाजांच्या जोरावर भारतावर सामना जिंकला होता.
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 5:53 PM

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील 5 सामने पार पडले. पाचव्या सामन्यानंतर ए ग्रुपमधून पाकिस्तान आणि टीम इंडियाने सुपर 4 मध्ये एन्ट्री केली आहे. तर साखळी फेरीतील सहावा आणि अंतिम सामन्यात बी ग्रुपमधील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या सामन्याच्या निकालानंतर बी ग्रुपमधून सुपर 4 साठी 2 संघ निश्चित होतील. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकलाय. मात्र बांगलादेशचे साखळी फेरीतील दोन्ही सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यानंतर सुपर 4 चं चित्र स्पष्ट होईल. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे.

टीमसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार बॅट्समन हा दुखापतीमुळे उर्वरित आशिया कप 2023 मधून बाहेर पडला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या बॅट्समनने आतापर्यंत या स्पर्धेत टीमसाठी शानदार कामगिरी केली होती. सुपर 4 च्या तोंडावर हा प्लेअर बाहेर पडल्याने टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. तो बॅट्समन नक्की कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

आशिया कप 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशचा बॅट्समन नजमुल हुसेन शांतो हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. नजमूलला अफगाणिस्तान विरुद्च्या सामन्यात दुखापतीमुळे त्रास जाणवत होता. बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सप्टेंबर रोजी सामना पार पडला. या सामन्यात नजमूल याने 105 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली होती.

बांगलादेशला मोठा झटका

नजमूलला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. नजमूलने सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी आवश्यक ते उपचार घेतले.नजमूलचे रिपोर्ट्स आले. एमआरआय रिपोर्टमध्ये नजमूलचे स्नायू ताणल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे बांगलादेश क्रिकेटच्या मेडीकल टीमने नजमूलला विश्रांतीचा सल्ला दिलाय.त्यामुळे नजमूलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बांगलादेश मेडीकल टीमने आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत नजमूलला विश्रांतीचा सल्ला दिलाय. मात्र नजमूलच्या जागी बदली खेळाडू म्हणून कुणालाही संधी देण्यात आलेली नाही.

आतापर्यंत सर्वाधिक धावा

दरम्यान नजमूलने आतापर्यंत आशिया कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. नजमूलने 2 सामन्यांमध्ये 96.50 च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 193 धावा केल्या. नजमूलने अफगाणिस्तान विरुद्ध 104 आणि श्रीलंका विरुद्ध 89 धावांची खेळी केली.

बागंलादेश क्रिकेट टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.