NZ vs BAN : बांगलादेशची न्यूझीलंडवर 150 धावांनी मात, मालिकेत 1-0 ने आघाडी
पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडवर 150 धावांनी विजय मिळवला आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बांगलादेशने विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दुसऱ्या डावात 331 धावांचं आव्हान दिलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 181 धावा करू शकला.
मुंबई : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी मालिकेत बांगलादेशनं न्यूझीलंडचा 150 धावांनी पराभव केला. तसेच मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. यासह बांगलादेशला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात बांगलादेशने सर्वबाद 310 धावा केल्या. यात महमुदुल हसन जोय याने 86 धावांची खेळी केली. तसेच त्याला नजमुल होसेन शांतो याने त्याला साथ देत 37 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 4, तर केन जेमिसनने 2 गडी बाद केले. पहिल्या डावातील धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सर्वबाद 317 धावा केल्या. कर्णधाल केन विल्यमसन याने 104 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने 7 धावांची आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात बांगलादेशने जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. सर्वबाद 338 धावा केल्या. यात नजमुल होसेन शांतोने 105 धावांची खेळी केली. त्यामुळे 331 धावांचा आव्हान देण्यात मदत झाली. बांगलादेशने दुसऱ्या डावात दिलेल्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अडखळला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 181 धावांवर बाद झाला. त्यामुळे 150 धावांनी पराभवाची नामुष्की ओढावली. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रवासात अडसर निर्माण झाला आहे. डेरिल मिचेलने शेवटपर्यंत झुंज देण्याच प्रयत्न केला पण त्याला यश मिळालं नाही.तैजुल इस्लामच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्याने 75 धावा देत 6 गडी बाद केले.
Dutch-Bangla Bank Test Series 2023Bangladesh 🆚 New Zealand 🏏 | 1st Test
Bangladesh won by 150 runs 🫶 🇧🇩
Full Match Details: https://t.co/T3QHK95rOi
Watch the Match Live on Gazi TV, T-Sports & Rabbithole#BCB | #Cricket | #BANvNZ pic.twitter.com/uEN2nCfdFy
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 2, 2023
दोन्ही संघाचे खेळाडू
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, नईम हसन, तैजुल इस्लाम, शरीफुल इस्लाम
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, काइल जेमिसन, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), एजाज पटेल