T20 World Cup आधी टीम इंडियाच्या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर, सामने कुठे?

T20 Series T20 World Cup 2024 : क्रिकेट चाहत्यांचं लक्ष यंदा टी 20 वर्ल्ड कपकडे लागून आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपआधी टी 20 सीरिज खेळणार आहे.

T20 World Cup आधी टीम इंडियाच्या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर, सामने कुठे?
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 7:54 PM

सध्या भारतात आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा महासंग्राम सुरु आहे. स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तर 26 मे ला अंतिम सामना पार पडेल. त्यानतंर वेस्टइंडिज आणि यूएसएमध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कपला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडिया टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20 मालिका होणार आहे.

क्रिकेट विश्वात यंदा मेन्ससह वूमन्स टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. बांगलादेशमध्ये टी 20 वूमन्स वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या हिशोबाने वूमन्स टीम इंडियासाठी ही मालिका फायदेशीर आणि मदतशीर ठरेल.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया वूमन्स टी 20 सीरिजंच आयोजन हे 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 दिवसआधी 23 एप्रिल रोजी बांगलादेशला पोहचेल. तर 10 मे रोजी दौरा आटपून वूमन्स टीम भारतात परतेल.

वूमन्स बांगलादेश विरुद्ध वूमन्स इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 28 एप्रिल, रविवार दुसरा सामना, 30 एप्रिल, मंगळवार तिसरा सामना, 2 मे, गुरुवार चौथा सामना, 6 मे, सोमवार पाचवा सामना, 9 मे, गुरुवार

बांगलादेशकडून टी 20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर

गेल्या दौऱ्यात काय झालं?

दरम्यान वूमन्स टीम इंडियाला गेल्या बांगलादेश दौऱ्यात मालिका जिंकता आली नाही. तेव्हा टीम इंडियाने मालिका बरोबरीत राखली. वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता या होम सीरिजमध्ये बांगलादेशचा कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.