Cricket | ‘हा’ दिग्गज वर्ल्ड कपमध्ये टीमसाठी खेळणार, पंतप्रधानांच्या भेटीनंतर क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय मागे

Retirement | पंतप्रधाांच्या मध्यस्थीनंतर कर्णधाराने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे हा दिग्गज आता पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे.

Cricket | 'हा' दिग्गज वर्ल्ड कपमध्ये टीमसाठी खेळणार, पंतप्रधानांच्या भेटीनंतर क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय मागे
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 7:26 PM

ढाका | आशिया कप स्पर्धा 2023 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. या स्पर्धेआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान याच्या भेटीनंतर स्टार कर्णधाराने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे हा दिग्गज खेळाडू आता श्रीलंका पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बांगलादेश वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन तमीम इक्बाल याने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. तमीम इक्बाल याने गुरुवारी 6 जुलै रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. तमीमने पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला होता. तमीमला निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना अश्रू अनावर झाले होते. मात्र आता पतंप्रधान शेख हसीना यांच्यासोबतच्या चर्चेनंतर आपला निर्णय 24 तासातच बदलला आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीच्या निर्णयानंतर शेख हसीना यांनी तमीमला घरी भेटीसाठी बोलावलं. या भेटीत इक्बाल आणि शेख हसीना यांच्यात चर्चा झाली. यानंतर तमीमने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. “आज दुपारी पंतप्रधानांनी मला घरी बोलावलं. त्यांनी मला कानउघडणी केली. त्यानंतर मला पुन्हा क्रिकेट खेळायला सांगितलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय”, असं तमीमने म्हटलंय. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तमीम इक्बाल आणि पंतप्रधान शेख हसीना

तमीम इक्बाल याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

तमीम इक्बाल याने बांगलादेशचं 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तमीमने 70 कसोटींमधील 134 डावांमध्ये 1 द्विशतक, 10 शतक आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 134 धावा केल्या आहेत.

तर तमीमच्या नावावर वनडेत बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तमीमने 241 एकदिवसीय सामन्यात 56 अर्धशतक आणि 14 शतकांच्या मदतीने 10 हजार 584 धावा केल्या आहेत. तर क्रिकेटमधील सर्वात लहान फॉर्मेट अर्थात टी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1 हजार 758 धावा केल्या आहेत. तमीमच्या नावावर कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करण्याचा अनोखा विक्रम आहे.

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका

दरम्यान बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका आहे. त्यानंतर उभयसंघात 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.