Bangaldesh Crisis: देशात तणावपूर्ण स्थिती, बांगलादेश क्रिकेट टीमचा मोठा निर्णय

Bangaldesh Cricket Team: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देशातील परिस्थितीमुळे अद्याप टीमची घोषणा केलेली नाही.

Bangaldesh Crisis: देशात तणावपूर्ण स्थिती, बांगलादेश क्रिकेट टीमचा मोठा निर्णय
bangladesh cricket teamImage Credit source: Hannah Peters/Getty Images
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 12:44 AM

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्ट पासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. मात्र बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून भयानक स्थिती आहे. त्यामुळे अद्याप बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचे खेळाडू या निर्णयानंतर लवकरच पाकिस्तानच्या दिशेने रवाना होतील.

पाकिस्तान-बागंलादेश कसोटी मालिका

पाकिस्तान-बागंलादेश कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे होणार आहे. बांगलादेशने या वेळापत्रकात बदल केला आहे. बांगलादेश या मालिकेसाठी 17 ऑग्सटला रवाना होणार होती. मात्र आता टीम 12 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसाठी कूच करणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला बांगलादेश कोचिंग स्टाफमधील विदेशी सदस्यांना सराव सत्रात सहभागी होता येणार नाही. कारण बांगलादेश दूतावासाने देशातील अराजकतेमुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे.

उभयसंघातील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग आहे. पहिला सामना हा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडीत आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना कराचीत खेळवण्यात येणार आहे. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट टीम 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान गद्दाफी स्टेडियममध्ये सराव करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी इस्लामाबादला रवाना होणार आहे. इस्लामाबाद येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेश 2020 नंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौरा करत आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर, कराची

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम: शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.