Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK W vs BAN W: 13 चेंडूत पाकिस्तानचा सुपडा साफ, विश्वचषकात बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी, रचले 4 किर्तीमान

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.

PAK W vs BAN W: 13 चेंडूत पाकिस्तानचा सुपडा साफ, विश्वचषकात बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी, रचले 4 किर्तीमान
Bangladesh Women’s Team (PAK W vs BAN W) Image Credit source: CC TWITTER
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:58 AM

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले. बांगलादेशच्या महिला संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली, जी पाहून पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी आल्यावर पहिल्या चेंडूपासून दबावात होती. परिणामी पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

बांगलादेशने पाकिस्तानचा 9 धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या बदल्यात केवळ 225 धावा करता आल्या. 234 धावांपूर्वी, बांगलादेशची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या 211 धावा इतकी होती, जी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना केली होती.

बांगलादेशचा विश्वचषकातील पहिला विजय

बांगलादेश महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झाला असून त्यांनी या स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे. गेल्या दोन सामन्यात दारुण पराभूत झालेल्या बांगलादेशच्या महिला संघाने पाकिस्तानला नमवून विजयाचं खातं उघडलं आहे.

बांगलादेशचे शानदार पुनरागमन

या सामन्यात बांगलादेशचा पराभव निश्चित दिसत होता. पाकिस्तानची धावसंख्या एकवेळ 2 विकेट्सच्या बदल्यात 183 धावा इतकी होती पण त्यानंतर त्यांनी अवघ्या 5 धावांमध्ये 5 विकेट गमावल्या आणि अखेरीस संघाला 225 धावाच करता आल्या.

बांगलादेश संघाने इंग्लंडला मागे टाकले

बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर मात करत गुणतालिकेत इंग्लंडच्या पुढे मजल मारली आहे. या स्पर्धेत इंग्लंडला आतापर्यंत दोन सामन्यांत दोन पराभवांना सामोरे जावे लागले असून बांगलादेशने आपले खाते उघडून सहाव्या स्थानावर कब्जा केला आहे.

बांगलादेशी महिला संघाकडून इतिहासाची पुनरावृत्ती

बांगलादेशच्या पुरुष संघाने 1999 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. त्या वेळी तिसर्‍या सामन्यात त्यांनी पहिला विजय नोंदवला होता. पुरुष संघाने 1999 मध्ये स्कॉटलंडचा 22 धावांनी पराभव केला होता. महिला संघानेदेखील पहिल्या विश्वचषकातील तिसरा सामना जिंकला आहे.

5 धावांत 5 बळी घेत बांगलादेशची पाकिस्तानवर मात

बांगलादेशच्या वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांच्या सलामीच्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 42 व्या षटकात 183 धावा झाल्या. म्हणजेच विजय आता 52 धावा दूर होता, त्या करण्यासाठी 7 विकेट्स आणि 8 षटके शिल्लक होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खेळपट्टीवर सेट झालेली फलंदाज सिद्रा अमीन क्रीझवर होती. त्यामुळे हा सामना पाकिस्तानचा संघ सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते.

पण इतकं सगळं पाकिस्तानच्या बाजूने असूनही पुढच्या 13 चेंडूंमध्ये असं काही घडतं, ज्यामुळे सामन्याचं दृश्यच बदलून जातं. पाकिस्तानची मधली फळी अचानक कोलमडली. 183 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर 188 धावांपर्यंत पाकिस्तानच्या 7 विकेट्स गेल्या होत्या. म्हणजेच 13 चेंडूत केवळ 5 धावांवर 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मधली फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या हातून सामना निसटला. बांगलादेशने त्यांच्या आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि त्यांच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

इतर बातम्या

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.