Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs BAN : बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं लक्ष्य, मुंबईच्या वानखेडेवर डिकॉकचं वादळ

SA vs BAN : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशमध्ये सुरू असेलल्या सामन्यामध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी पावनेचारशे धावा ठोकल्या आहेत. धर की बडीव कोणत्याही बॉलरला त्यांनी सुट्टी दिली नाही. डोंगराएवढं लक्ष्याचा बांगला टायगर्स करण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SA vs BAN : बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं लक्ष्य, मुंबईच्या वानखेडेवर डिकॉकचं वादळ
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 6:20 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सामन्यामध्ये आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 382 धावा केल्या आहेत. आफ्रिकेचा सलामीवील क्विंटन डि कॉक याच्या आक्रमक 174 धावांची वादळी खेळी केली.  त्यासोबतच हेनरिक क्लासेन यानेही 90 धावा केल्या आहेत. बांगलादेश संघाकडून हसन महमूद याने सर्वाधिक विकेट घेतल्या. बांगलादेश 383 धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतात की नाही महत्त्वाचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या क्विंटन डिकॉक याने सुरूवातीला वेळ घेतला त्यानंतर त्याने थांबायचं काही नाव घेतलं नाही. सातव्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला. रीझा हेंड्रिक्स 12धावा करून आऊट झाला, त्यानंतर रॅसी व्हॅन डर डुसेही 1 धाव काढून आऊट झाला. त्यानंतर डिकॉक आणि मार्करम यांनी मजबूत भागीदारी केली. मार्करम 60 धावांवर असताना शाकिबने त्याला आऊट करत ही जोडी फोडली.

167 धावांवर तीन विकेट गेल्यावर क्लासेन आला होता. डिकॉक आणि क्लासेन यांनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दोघांनीही मोठी भागीदारी करत संघाला 300 धावांचा टप्पा पार केला. डिकॉक २०० धावा करणार असं वाटत असताना हसन महमूद याला मोठा फटका मारण्याच्या नादात 174धावांवर तो आऊट झाला.

दरम्यान, डिकॉक बाद झाल्यावर क्लासेन याने आपला दांडपट्ट फिरवायला सुरूवात केली होती. मात्र 90 धावांवर तो बाद झाला. शेवटला किलर मिलरने15  बॉलमध्ये 34 धावां केल्या यामध्ये त्याने 4 सिक्सर मारले. बांगलादेश हे आव्हान पूर्ण करतं नाही हे पाहणं याकडे क्रीडा चाहत्यांच लक्ष लागलं आहे.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (C), मेहदी हसन मिराझ, मुशफिकुर रहीम (W), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मारर्कम  (C), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझाद विल्यम्स

'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.