मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या संघांची आता घोषणा होत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही शनिवार आशिया कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. शाकिब अल हसन याच्या नेतृत्वात 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तमीम इकबाल याने वनडे संघाचं नेतृत्व सोडल्याने ही जबाबदारी आता शाकिब अल हसन याच्या खांद्यावर देण्यात आलीआहे. तमीम इकबाल दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही. दुसरीकडे या संघात अष्टपैलू महामुदुल्लाह याला स्थान मिळालेलं नाही. तसेच तंजीद हसन तमीम याला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळालं आहे. तमीम इकबाल याच्या जागी त्याला संघात स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे. इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत त्यांने चांगली कामगिरी केली होती. तसेच 2020 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
आशिया कप स्पर्धेत ग्रुप बी मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहे. बांगलादेश आपला पहिला सामना 31 ऑगस्टला कँडीमध्ये श्रीलंके विरुद्ध खेळणार आहे. महामुदुल्लाह आणि तमीम संघात नसल्याने इतर वरिष्ठ खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे. कर्णधार शाकिब, लिटन दास, मुश्फीकुर रहिम यांना मोर्चा सांभाळावा लागणार आहे. यांच्यावर फलंदाजीची धुरा असणार आहे.
बांगलादेश संघात नासुम अहमद, मेहेदी हसन आणि मोहम्मद नईम यांनाही संधी मिळाली आहे. नासुमने बांगलादेशमद्ये आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या मालिकेनंतर कोणतीच वनडे खेळला नाही. मेहेदी हसन याने 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध आपली शेवटचा वनडे खेळला होता. त्यालाही या संघात संधी मिळाली आहे. त्याला अष्टपैलू महामुदुल्लाहची जागा मिळू शकते.
बांगलादेश अद्याप एकही आशिया कप जिंकलेला नाही. 2012 मध्ये आशिया कप जिंकण्याच्या वेशीवर होती. पण पाकिस्ताने या सामन्यात विजय खेचून आणला होता. आता शाकिबच्या नेतृत्वात आशिया कप विजयाचे स्वप्न पाहिलं जात आहे.
The Bangladesh Squad for the Asia Cup 2023. 🏏 🇧🇩#BCB | #cricket | #AsiaCup2023 pic.twitter.com/lv3Yd7Twix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 12, 2023
शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.