IND vs BAN : दुसऱ्या सामन्याआधी माजी कर्णधाराची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, टीमला धक्का
Test Retirement : टीम इंडिया-बांगलादेश दोन्ही संघ दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याच्या काही तासांआधी माजी कर्णधार आणि ऑलराउंडरने निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला आहे.
टीम इंडिया-बांग्लादेश यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा शुक्रवार 27 सप्टेंबरपासून कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला 2-0 ने क्लीन स्वीप करण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशसमोर मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑलराउंडर आणि माजी कर्णधार राहिलेल्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.
बांगलादेशचा ऑलराउंडर आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन याने 2 प्रकारातून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. शाकिबने तात्काळ प्रभावाने टी 20I क्रिकेटला रामराम केला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधून केव्हा निवृत्त होणार? याबाबतही शाकिबने माहिती दिली आहे. शाकिबन कानपूर कसोटीच्या आधी पत्रकार परिषदेत निवृत्तिबाबतची माहिती दिली.
बांगलादेश टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. त्या मालिकेतील शेवटचा सामना हा शाकिबचा अखेरचा सामना असणार आहे. तशी माहितीच शाकिबने दिली आहे. शाकिबने तशी इच्छाच व्यक्त केली आहे. मात्र शाकिबला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सुरक्षेची हमी मिळाली नाही, तर कानपूरमधील सामना हा त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरु शकतो.
शाकिबचा टी20i क्रिकेटला अलविदा, कसोटीतून निवृत्ती जाहीर
🚨JUST IN🚨
Shakib Al Hasan is set to retire from Test cricket after the Mirpur Test against South Africa. He has also confirmed that he has already played his last T20 match in this year’s World Cup. pic.twitter.com/9fAwCOyW6U
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 26, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.