विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई-बाबा होणार आहेत. अनुष्का येत्या काही दिवसात कधीही बाळाला जन्म देऊ शकते. त्यामुळेच विराट त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून आला. सध्या ते दोघे जास्तीतजास्त वेळ सोबत घालवत आहेत (Virat Kohli To Be Blessed With A […]

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 3:21 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई-बाबा होणार आहेत. अनुष्का येत्या काही दिवसात कधीही बाळाला जन्म देऊ शकते. त्यामुळेच विराट त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून आला. सध्या ते दोघे जास्तीतजास्त वेळ सोबत घालवत आहेत (Virat Kohli To Be Blessed With A Baby Girl).

विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ असणार आहे. विराट आणि अनुष्कासोबतच त्यांचे चाहते देखील येणाऱ्या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. विरुष्काला मुलगी होणार की मुलगा या प्रश्नाचं उत्तर येत्या काहीच दिवसात सर्वांना कळणार आहे. मात्र, एका ज्योतिषीने याचं उत्तर दिलं आहे.

इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, बंगळुरुच्या एका ज्योतिषीने सांगितलं, “विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला आहे.

क्रिकेटर्सची पहिलं मुल मुलगी

क्रिकेटर्सबाबत बोलायचं झालं तर देश विदेशातील बड्या क्रिकेटर्सचं पहिलं मुल हे मुलगी आहे. मग सचिन तेंडुलकरची मुलगी सारा असो किंवा सौरव गांगुलीची मुलगी सना. इतकंच काय तर भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीलाही मुलगी आहे. तिचं नाव जिवा आहे. त्याशिवाय, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन या सर्वांचं पहिलं मुल हे मुलगी आहे (Virat Kohli To Be Blessed With A Baby Girl)

तसंतर विरुष्काला मुलगी झाली किंवा मुलगा झाली त्याने काहीही फरक पडत नाही. त्यांचे चाहत्यांना त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

खाजगी आयुष्यात ढवळाढवळ, फोटोग्राफरवर अनुष्काचा संताप

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीसोबत तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत वेळ घालवत होती. त्यांचे हे खाजगी क्षण एका फोटोग्राफरने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले. विराट अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पण, वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या या फोटोग्राफरवर अनुष्का चांगलीच संतापली.

तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर करुन फोटोग्राफर आणि त्या पब्लिकेशनबाबत आपला रोष व्यक्त केला. “फोटोग्राफर आणि पब्लिकेशनला वारंवार मनाई केल्यावरही ते आमच्या खाजगी आयुष्यात डोकावत आहेत. कृपया हे थांबवा”, असं कॅप्शन तिने या स्टोरीला दिलं.

Virat Kohli To Be Blessed With A Baby Girl

संबंधित बातम्या :

Viranushka | विराट कोहलीसोबत मध्यरात्री ‘या’ व्यक्तीला भेटायला गेली अनुष्का शर्मा!

Photo : बेबं बंप फ्लॉन्ट करत अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

आपल्या बाळाने दुसरा तैमूर होऊ नये, विराट-अनुष्काचं प्लॅनिंग ठरलं

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.