Rinku Singh : स्फोटक फिनिशर रिंकु सिंह याला लॉटरी, आयपीएलआधी मिळालं कर्णधारपद
Rinku Singh Captain : टीम इंडियाचा युवा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह याची आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) आणखी काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या 18 व्या मोसमसाठी काही दिवसांपूर्वीच मेगा ऑक्शन पार पडलं. एकूण 10 संघांनी गरजेनुसार काही खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. तर स्टार खेळाडूंना कायम ठेवलं अर्थात करारमुक्त केलं नाही. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सनेही काही खेळाडूंना कायम ठेवलं. केकेआरने विस्फोटक फलंदाज रिंकु सिंह याला कायम ठेवलं. त्यानंतर आता रिंकु सिंहला मोठी लॉटरी लागली आहे. रिंकु सिंहची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही दिवसांपूर्वी मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता 21 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी (वनडे) स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश टीमने रिंकु सिंहची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. यूपीसीएने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता रिंकू मैदानात एक खेळाडू नाही तर कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
कॅप्टन रिंकू सिंह
Captain Rinku Singh will lead Team UP’s charge this season of the #VijayHazareTrophy! #UPCA #UPCricket pic.twitter.com/4jrdve1DPT
— UPCA (@UPCACricket) December 17, 2024
रिंकूसाठी महत्त्वाची स्पर्धा
रिंकूसाठी ही स्पर्धा निर्णयाक असणार आहे. रिंकूला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर या एकदिवसीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची संधी आहे. त्यामुळे रिंकू या संधीचं कसं सोनं करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
यूपी या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात जम्मू काश्मीर विरूद्धच्या सामन्याने करणार आहे. उभयसंघातील सामना हा 21 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर मिझोरम, तामिळनाडू, छत्तीसगढ, चंडीगढ आणि विदर्भविरुद्ध सामने होणार आहेत. तर 15 आणि 16 जानेवारीला उपांत्य फेरीतील सामने होतील. तर 18 जानेवरीला विजेता निश्चित होईल.
विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेश टीम : रिंकू सिंह (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, माधव कौशिक, करण शर्मा, प्रियम गर्ग, नितीश राणा, अभिषेक गोस्वामी, अक्षदीप नाथ, आर्यन जुयाल, आराध्य यादव, सौरभ कुमार, कृतज्ञ कुमार सिंह, विप्रज निगम , मोहसिन खान, शिवम मावी, आकिब खान, अटल बिहारी राय, कार्तिक्य जयस्वाल आणि विनीत पंवार.