BBL 2025 : बिग बॅश लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा पहिला ड्राफ्ट जाहीर, या भारतीयांचं यादीत नाव

आयपीएलप्रमाणे बिग बॅश लीग ही नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळतात. आगामी स्पर्धेसाठी महिला आणि पुरुष नामांकन जाहीर केलं आहे. बिग बॅश लीगच्या परदेशी खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा दिसत आहे. पहिल्या यादीत भारतीय खेळाडूंचं नाव जाहीर कझालं आहे.

BBL 2025 :  बिग बॅश लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा पहिला ड्राफ्ट जाहीर, या भारतीयांचं यादीत नाव
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 4:57 PM

बिग बॅश लीग स्पर्धेसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. वुमन्स बिग बॅश लीग 27 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर आणि मेन्स बिग बॅश लीग 15 डिसेंबर ते 27 जानेवारी असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वुमन्स बिग बॅश लीग आणि मेन्स बिग बॅश लीग या दोन्ही स्पर्धेच्या पहिल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. दोन्ही स्पर्धेत 10-10 खेळाडूंना जागा मिळाली आहे. बिग बॅश लीग स्पर्धेचं हे दहावं पर्व आहे. खेळाडूंसाठी प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि कांस्य श्रेणी असा मसुदा तयार केला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना प्लेयर ड्राफ्टमध्ये जागा मिळाली आहे. तसेच या यादीत इंग्लंड स्टार्स सोफी एक्लेस्टोन आणि हीदर नाइट यांचा समावेश आहे .हरमनप्रीत कौर सध्या मेलबर्न रेनेगेड्स संघाचा भाग आहे. त्यामुळे या संघाला हरमनप्रीत कौरला ड्राफ्ट प्रक्रियेतून पुन्हा एकदा संघात घेण्याची संधी आहे.

सोफी एक्लेस्टोन वनडे आणि टी20 क्रिकेट फॉर्मेटमधील अव्वल गोलंदाज आहे. त्यामुळे तिला संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळेल. सिडनी सिक्सर्स सोफी एक्लेस्टोन संघात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल . पण सिक्सर्सना पहिल्या फेरीत प्लॅटिनम किमतीत एक्लेस्टोनला संघात ठेवण्यासाठी पैशांचं गणित बसवण्याचं आव्हान असेल.

बिग बॅश लीगमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफलाही पुरुष खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खान आणि वेगवान गोलंदाज हारिस रउफ यांनाही प्लेअर्स ड्राफ्टमध्ये स्थान मिळाले आहे.

बीबीएल मेन्स प्लेयर ड्रॉफ्टमधील खेळाडू – लॉरी इवांस (पर्थ स्कॉर्चर्स), लॉकी फर्ग्यूसन, एलेक्स हेल्स (सिडनी थंडर), शमर जोसेफ, शादाब खान, जेमी ओवरटन (एडिलेड स्ट्राइकर्स), हारिस रउफ (मेलबर्न स्टार्स), जेसन रॉय, मुजीब उर रहमान (मेलबर्न स्टार्स), जेम्स विंसे (सिडनी सिक्सर्स).

बीबीएल वुमन्स प्लेयर ड्रॉफ्टमधील खेळाडू – सुजी बेट्स (सिडनी सिक्सर्स), एलिस कॅप्सी (मेलबर्न स्टार्स), सोफी एक्लेस्टोन (सिडनी सिक्सर्स), शबनम इस्माइल (होबार्ट हरिकँस), हरमनप्रीत कौर (मेलबर्न रेनेगेड्स), हीथर नाइट (सिडनी थंडर), जेमिमा ऱॉड्रिग्स, दीप्ति शर्मा, लॉरा वोल्वार्ड्ट (एडिलेड स्ट्राइकर्स), डॅनी व्याट (पर्थ स्कॉर्चर्स)।

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.