Ireland vs India : पुणेकर खेळाडूचं नशीब पालटलं, थेट टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी निवड

Team India : टीम इंडियाचं ब्रह्मास्त्र असलेल्या यॉर्कर किंग बुम बुम बुमराह याचं कमबॅक केलं आहे. कमबॅक करत असलेल्या बुमराहच्या गळ्यात थेट कर्णधारपदाची माळ पडली आहे. तर दुसरीकडे उपकर्णधारपदी मराठमोळ्या खेळाडूकडे उपकर्णधापद सोपवण्यात आलं आहे.  

Ireland vs India : पुणेकर खेळाडूचं नशीब पालटलं, थेट टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी निवड
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 7:48 AM

मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील तिसरा एकदिवसीय सामना आज होणार आहे. या मालिकेदरम्यान आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आयर्लंड दौऱ्यावर टीम ‘यंगिस्तान’ला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासोबतच संघाच्या कर्णधारपदी टीम इंडियाचं ब्रह्मास्त्र असलेल्या यॉर्कर किंग बुम बुम बुमराह याने कमबॅक केलं आहे. कमबॅक करत असलेल्या बुमराहच्या गळ्यात थेट कर्णधारपदाची माळ पडली आहे. तर दुसरीकडे उपकर्णधारपदी मराठमोळ्या खेळाडूकडे उपकर्णधापद सोपवण्यात आलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

पुणेकर असलेल्या या खेळाडूसाठी मोठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर त्याच्या करिअरचा आलेख उंचावताना दिसत आहे. वेस्ट इंजिज दौऱ्यावर या खेळाडूला अंतिम ११ मध्ये स्थान मिळालं नाही. मात्र टी-२० मालिकेसाठी त्याच्याकडे संघाच्या उपकर्णारपदाची धूरा देण्यात आली आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जबरदस्त बॅटींगने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या नवा दमाच्या खेळाडूकडे मोठी जबाबदारी आली आहे. एशियन गेम्समध्येसुद्धा ऋतुराज गायकवाडकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

टीम इंडियामध्ये आता आयपीएल स्टार खेळाडू रिंकू सिंह याची वर्णी लागली आहे. दुखापतीमधून सावरलेल्या प्रसिद्ध कृष्णा याचीही निवड झाली आहे. पॉवर हिटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवम दुबेचीही तीन वर्षांनंतर संघात एन्ट्री झाली आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट. आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट. आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जसप्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

Non Stop LIVE Update
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.