BCCI Selection Committee : बीसीआयकडून टीम इंडियाच्या निवड समितीची घोषणा
बीसीसीआयने निवड समितीची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे खेळलेल्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.
मुंबई : बीसीसीआयने महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीची घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने श्यामा डे शॉ यांची भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीच्या सदस्य म्हणून निवड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्हीएस टिळक नायडू यांची ज्युनिअर महिला निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
श्यामा यांनी भारतासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे असे एकूण 8 सामने खेळले आहेत. क्रिकेट करिअरला अलविदा केल्यानंतर ती बंगालची सिलेक्टरही होती. डावखुऱ्या फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज, शॉने तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. 1985 ते 1997 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केलं आणि नंतर 1998 ते 2002 पर्यंत रेल्वेकडून खेळल्या होत्या.
? NEWS ?: BCCI announces Women’s Selection Committee & Junior Cricket Committee appointments.
The CAC has unanimously recommended Ms Shyama Dey Shaw and Mr VS Thilak Naidu for the said positions.
More Details ?https://t.co/EGKhomrBE1
— BCCI (@BCCI) June 19, 2023
व्हीएस टिळक नायडू यांनी 1998-99 ते 2009-10 दरम्यान कर्नाटक तसेच दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नायडू यांनी 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा केल्या आहेत. 2013 ते 2016 या काळात त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे.
दरम्यान, महिला भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्षाच्या शेवटला भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत चालणार आहे.