SA vs IND T20i Series : 1 मालिका, 4 सामने आणि 15 खेळाडू, दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, कॅप्टन कोण?
South Africa vs India T20i Series 2024 Schedule : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकूण 4 सामन्यांची टी20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
रोहित सेना याच्या नेतृत्वात टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20i मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध एकूण 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 8 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर चौथा आणि अंतिम सामना हा 15 नोव्हेंबरला होणार आहे.
3 नव्या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी
निवड समितीने या टी 20i सीरिजसाठी 3 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये 27 वर्षीय फलंदाज रमनदीप सिंह, विजयकुमार वैशाख आणि यश दयाल या तिघांचा समावेश आहे. रमनदीपची एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत निवज करण्यात आली होती. भारताने या स्पर्धेत तिलक वर्मा याच्या नेतृत्वात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
दोघे आऊट
तसेच टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे मालिकेत सहभागी न केल्याची माहिती बीसीसीआय दिली. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लगालं आहे. दुखापतीमुळे दोघेही निवजडीसाठी उपलब्ध नव्हते. तसेच रियान पराग याचाही समावेश करण्यात आलेला आही. रियानला फार आधी खांद्याला दुखापत झाली होती. रियान या खांद्याच्याच दुखापतीतून लवकरात लवकर पूर्णपणे बरा होण्याच्या तयारीत आहे.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 8 नोव्हेंबर, डरबन
दुसरा सामना, 10 नोव्हेंबर,
तिसरा सामना, 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथा सामना, 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग
टी 20i मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
All the details of #TeamIndia’s squad announcement for tour of South Africa & Border-Gavaskar Trophy 🔽#SAvIND | #AUSvINDhttps://t.co/EW5yZdsHcj
— BCCI (@BCCI) October 25, 2024
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, अवेश खान आणि यश दयाल.