वर्ल्ड कपनंतर परत एकदा भारत-पाक आमनेसामने, BCCI कडून टीमची घोषणा
India vs Pakistan : क्रिकेटमध्ये भारत-पाक सामना म्हणजे हायव्होल्टेज सामना हे जणू काही समीकरण ठरलं आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. आता परत एकदा भारत-पाक सामन्याचा क्रिकेट चाहत्यांना आनंद घेता येणार आहे.
मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांच्या पदरी परत एकदा निराशा पडली आहे. भारताने साखळी फेरीमधील सर्व सामने जिंकले पण फक्त एका सामन्याने वर्ल्ड कप उंचावण्याच्या स्वप्नापासून दूर राहावं लागलं. भारतीय संघाचं साखळी सामन्यातील प्रदर्शन पाहता सर्वांना वाटलं होतं, यंदाची फायनलची ट्रॉफी भारतीय संघ उचलणार होता मात्र ऑस्ट्रेलिया संघाने शेवटच्या सामन्यात बाजी पलटवली. आता वर्ल्ड कपनंतर परत एकदा भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
नेमका कधी आणि कुठे होणार सामना?
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान झालेला सामना फक्त नावाला हाय व्होल्टेज झाला. कारण भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. आता परत भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये भिडणार आहेत. 10 डिसेंबरला अंडर 19 आशिया चषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. BCCI च्या कनिष्ठ क्रिकेट समितीने UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक 2023 साठी भारताच्या अंडर-19 संघाची घोषणा केली आहे.
अंडर 19 आशिया चषक ही स्पर्धा एकूण 8 संघांमध्ये होणार आहे. आठ संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. यामधील ‘अ’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे चार संघ असणार आहेत. तर ‘ब’ गटामध्ये श्रीलंका, जपान, युएई आणि बांगलादेश या चार संघांचा समावेश केला गेला आहे.
🚨 NEWS 🚨
India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup announced
Details 🔽https://t.co/dZHCSv32a6
— BCCI (@BCCI) November 25, 2023
दरम्यान, भारताने सर्वाधिक 8 वेळा अंडर 19 आशिया चषक विजेतेपद जिंकलं आहे. 2021 मध्ये भारताने शेवटी वेळी श्रीलंका संघाचा पराभव करत ट्रॉफी जिंकली होती. यंदा भारतीय संघाचं नेतृत्त्व पंजाबच्या उदय सहारन याच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
अंडर 19 आशिया कपसाठी भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (c), अरावेली अवनीश राव (wk), सौम्य कुमार पांडे (vc), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर) धनुष गौडा. , आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.