Toss: बीसीसीआयने टॉस ‘उडवला’, जय शाह यांची मोठी ‘खेळी’

Bcci Remove Toss: बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टॉस हद्दपार केला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.ic

Toss: बीसीसीआयने टॉस 'उडवला', जय शाह यांची मोठी 'खेळी'
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 4:15 PM

साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे सध्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेकडे लागून आहे. या स्पर्धेत आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना 2 सुपर ओव्हर पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीच्याच काही सामन्यांमध्ये स्पर्धेत रंगत पाहायला मिळाली आहे. आता 9 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलंय. अशात दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आता थेट टॉस हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात या निर्णयाबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

बीसीसीआयने गुरुवारी 6 जून रोजी देशांतर्गत स्पर्धा 2024-2025 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने एकूण 10 महत्त्वाच्या स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलंय. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं सर्वात आधी 5 सप्टेंबरपासून अनंतपूर येथे सुरुवात होणार आहे. तसेच बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

बीसीसीआयने टॉस ‘संपवला’

बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेत सीके नायडू ट्रॉफीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत आता यापुढे टॉस होणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे पाहुण्या संघाला बॅटिंग करायची की फिल्डिंग याचा निर्णय घेण्याची मुभा असणार आहे. त्यामुळे यजमान संघावर हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया उमटतेय. त्यामुळे बीसीसीआय या निर्णयाबाबत काय भूमिका घेते, याकडेही लक्ष असणार आहे.

बीसीसीआयने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार बीसीसीआयने खेळाडूंच्या आरोग्याला प्राथमिकता दिली आहे. खेळाडूंना पर्याप्त वेळ मिळावा आणि कामगिरीत चांगला फरक पडावा या हेतून बीसीसीआयने 2 सामन्यांमध्ये ठराविक अंतर ठेवलं आहे. तसेच आता प्रतिष्ठेची असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धा 2 टप्प्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. ज्यामध्ये लिमिटेड ओव्हर स्पर्धेसाठी 1 विंडो ठेवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील महाअंतिम सामना हा मे 2025 मध्ये पार पडणार आहे.

बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर

तसेच सीके नायडू अंडर 23 स्पर्धेत एक नव्या अंक प्रणालीचा प्रयोग केला जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, यंदा स्पर्धेत सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग आणि बॉलिंगसाठी पॉइंट्स दिले जातील. तसेच पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या किंवा विजयासाठी 2 पॉइंट्स दिले जातील. बीसीसीआयच्या या निर्णयांमुळे देशांतर्गत स्पर्धेत नक्कीच बदल पाहायला मिळतील.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...